Sajid Khan Childhood Photo: सेलिब्रेटींचे फोटो हे सोशल मीडियावर बरेच व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा असते. सध्या अशाच एका बड्या सेलिब्रेटीचा फोटो हा व्हायरल होताना दिसतो आहे. त्याच्या तरूणपणीचा फोटो पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. सोबतच तुम्हाला पटकन ओळखताही येणार नाही. हा बॉलिवूडचा एक मोठा दिग्दर्शक आहे. त्याचे अनेक चित्रपट हे प्रसिद्ध आहेत.
सोबतच त्याची सख्खी बहीणही लोकप्रिय दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर आहे. आम्ही तुम्हाला सांगत आहोत साजिद खानबद्दल. साजिद खानचे तुम्ही अनेक लोकप्रिय चित्रपट हे पाहिले असतीलच. त्यातून त्याच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवरही फार मोठी कमाई केली होती. काल त्यांचा वाढदिवस होता. साजिद खान यांची सख्खी बहीण फराह खानही मोठी दिग्दर्शिका आहे.
'हाऊसफुल्ल', 'हिम्मतवाला', 'हमशकल्स' अशा काही चित्रपटांचे त्यानं दिग्दर्शन केले आहे. त्यामुळे त्याची बरीच चर्चाही रंगलेली होती. सध्या त्याचा हा जुना शाळेतला फोटो हा चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. साजिद खान हा जितका लोकप्रिय दिग्दर्शक आहे. त्याचे नावं हे अनेकदा विविध वादांमध्येही अडकले आहे. त्यातून त्याचे नावं हे मीटू मूमेंटमध्येही आले होते. सोबतच त्यानं अनेक लोकप्रिय रिएलिटी शोमध्येही त्यानं सहभाग दर्शवला होता. त्यामुळे त्याची बरीच चर्चा होती. नच बलिए या रिएलिटी शोमध्येही तो जजच्या भुमिकेत होता. त्यानंतर बिग बॉसमध्येही त्यानं एन्ट्री घेतली होती.
हेही वाचा : महिला वेटरनं पतीला 'स्विटहार्ट' म्हटल्यावर पत्नीचा चढला; बदल्यात अशी Tip लिहून दिली की...
रिपोर्टनुसार, ते 6 वर्षांचे असताना त्यांच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला होता. त्यावेळी आपल्या बहीणीसह ते 2 दिवस राहायचे तर आपल्या आईसोबत ते 5 दिवस राहायचे. त्यांना अनेक मानसिक तणावांचाही सामना करावा लागला होता. असंही कळतं की ते तरूणपणी चित्रपट पाहण्यासाठी तिकिटाची चोराही करायचे.
त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांनी अनेक गोष्टी या बदलल्या. त्यांनी स्वत:ला फारच गांभीर्यानं घेतलं आणि मग आपल्या करिअरला पुढं नेल.