मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही एक अशी मालिका आहे ज्यामध्ये येणारे प्रत्येक पात्र लोकांच्या हृदयात आपलं स्थान निर्माण करतं. 'TMKOC' फेम अभिनेत्री आराधना शर्मा देखील या शोमध्ये दिसल्यानंतर लोकांची पहिली पसंती बनली आहे. पण तुम्हाला माहित आहे का की, आराधना खऱ्या आयुष्यातही खूप बोल्ड आहे आणि तिने एका मुलाखतीत तिच्या आयुष्याशी संबंधित असं एक रहस्य सांगितलं होतं जे ऐकून सगळेच आश्चर्यचकित झाले.
पहिल्या भेटीत शारिरीक संबधाची मागणी
आराधना शर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि दररोज ती तिच्या बोल्ड फोटोंद्वारे चर्चेत असते. एका वृत्तानुसार, एका मुलाखतीत आराधनाने सांगितलं की, जेव्हा ती पहिल्यांदा तिच्या बॉयफ्रेंडसोबत डेटवर गेली होती तेव्हा त्याने आराधनाकडून सेक्सची मागणी केली होती. ती म्हणाली की, पहिल्या भेटीतच तिला सेक्स करताना अस्वस्थ वाटत होतं. मात्र या मुलाने तिला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडण्यास सुरुवात केली. त्याने किस घेण्याचा देखील प्रयत्न केला मात्र अभिनेत्रीने स्पष्टपणे नकार दिला आणि म्हणाली, नाही म्हणजे नाही..
याआधी एका मुलाखतीत आराधनाने तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी आणखी एक गोष्ट सांगून सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं. तिने सांगितलं होतं की, ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत जवळपास दीड वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होती. यादरम्यान, दोघांनी बऱ्याचदा सेक्स केला, ही खूप सोपी गोष्ट आहे. पण शारीरिक संबंध ठेवल्यानंतर एक दिवस आराधनाला शंका आली. काहीतरी चूकत असल्याचं तिला वाटू लागलं. एक दिवस तिच्या लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे. एवढा कंटाळा कसा येतोय? आराधना वेळ न घालवता केमिस्टमध्ये गेली. तिथून प्रेग्नसी टेस्ट घेतली. घरी येऊन तपासणी केली. घरी येऊन तपासणी केली. पण ती निगेटिव्ह होती. त्यानंतर तिने सुटकेचा श्वास घेतला