मुंबई : सध्या सर्वत्र 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) सिनेमाची चर्चा रंगत आहे. सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सिनेमा पाहून अनेकांना गहीवरून देखील आलं. प्रेक्षकांच्या मनात आणि बॉक्स ऑफिसवर सिनेमा राज्य करत आहे. 11 मार्च रोजी रुपेरी पडद्यावर दाखल झालेला 'द काश्मीर फाइल्स' हाऊस फुल होताना दिसत आहे.
सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहाबाहेर प्रेक्षकांची एकचं गर्दी जमली आहे. सिनेमा प्रदर्शित होवून आज 5वा दिवस आहे. पाचव्या दिवसापर्यंत सिनेमाने छप्पर फाड कमाई केली आहे. सध्या सर्वत्र सिनेमाची चर्चा रंगत आहे.
#TheKashmirFiles continues to create HAVOC… SMASHES myths and DEMOLISHES #BO records… Day-wise numbers are an EYE-OPENER, a CASE STUDY… Fri 3.55 cr, Sat 8.50 cr, Sun 15.10 cr, Mon 15.05 cr, Tue 18 cr, Wed 19.05 cr. Total: ₹ 79.25 cr. #India biz. pic.twitter.com/f5VpIwmaVH
— taran adarsh (@taran_adarsh) March 17, 2022
सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांतचं एका वेगळ्या उंचीवर पोहोचला आहे. बुधवारी म्हणजे सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सहा दिवसांनंतर बॉक्स ऑफिसवर 19 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे.
सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सहा दिवसांत मारलेली मजल...
शुक्रवार 3.55 कोटी
शनिवार 8.50 कोटी
रविवार 15.10 कोटी
सोमवार 15.05कोटी
मंगळवार 18 कोटी
बुधवार 19 कोटी
ट्रेड ऍनलिस्ट तरण आदर्श यांनी दिलेल्या माहितीनुसार सिनेमाने आतापर्यंत जवळपास 79 कोटी 25 लाख रुपयांचा गल्ला जमा केला आहे. सिनेमा 100 कोटींचा गल्ला पार करेल असा अंदाज वर्तवण्यात येणार आहे.
'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) सिनेमात 1990 मध्ये काश्मीरमध्ये झालेला नरसंहार आणि काश्मिरी पंडितांवर झालेला हृदयद्रावक अत्याचार पडद्यावर दाखवण्यात आला आहे.