मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल २३ मे रोजी जाहीर करण्यात आला. निकालाच्या दुसऱ्या दिवशी 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपट रूपेरी पडद्यावर दाखल झाला. दोन दिवसात फक्त २ कोटी ८८ लाख रूपयांचा गल्ला या चित्रपटाने जमवला. समीक्षक आणि प्रेक्षकांकडून चित्रपटाला विशेष दाद मिळत नसल्याचे दिसत होते. पण आता हे चित्र पलटले आहे. चित्रपटाच्या कमाईचा आकडा चढत्या क्रमावर असल्याचे दिसत आहे. भाजपाच्या विजयानंतर चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली मजल मारेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. ही शक्यता आता सत्यात उतरताना दिसत आहे.
#PMNarendraModi showed positive trending across the weekend... Biz on Day 3 gave the much-required push... Weekdays crucial, since it needs to maintain the momentum for a satisfactory total... Fri 2.88 cr, Sat 3.76 cr, Sun 5.12 cr. Total: ₹ 11.76 cr. India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) May 27, 2019
ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरवर चित्रपटाच्या कमाईचे आकडे शेअर केले आहेत. चित्रपटाने तीन दिवसात ११ कोटी ७६ लाख रूपयांचा गल्ला जमवला आहे. आता येत्या काळात चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती रूपयांची मजल मारेल हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
ओमंग कुमार दिग्दर्शित 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉयने नरेंद्र मोदींची प्रमुख भूमिका साकारली आहे. प्रदर्शनापूर्वी चित्रपटाबाबत मोठा वाद निर्माण झाला होता. चित्रपट प्रदर्शनाच्या तरखांमध्ये सुद्धा सतत बदल करण्यात येत होते. त्याचप्रमाणे चित्रपटाविरोधात याचिका देखील दाखल करण्यात आली होती.