बोनी कपूर यांनी नॅशनल टीव्हीवर उघड केलं जान्हवी कपूरचं बाथरुम सिक्रेट

वडिलांकडूनच जान्हवी कपूरचं 'ते' सिक्रेट उघड, म्हणाले ती बाथरुममध्ये...  

Updated: Nov 2, 2022, 09:16 PM IST
बोनी कपूर यांनी नॅशनल टीव्हीवर उघड केलं जान्हवी कपूरचं बाथरुम सिक्रेट title=

The Kapil Sharma Show : कॉमेडी शो कपिल शर्मा दर आठवड्याला आपलं मनोरंजन करत. जिथे फुल धमाल असते. जिथे फुल ऑन मस्ती असते. आणि प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जातं. नुकताच कपिल शर्माचा नवा सीझन सुरु झाला आहे. आणि प्रेक्षकांमध्ये याची चर्चा आहे.

शोमध्ये मस्ती व्यतिरीक्त बऱ्याचदा सेलिब्रिटींशी संबधित सिक्रेट्सदेखील बाहेर येतात. आता कपिल शर्मा शोमध्ये मिली स्टार जान्हवी कपूर आणि प्रोड्यूसर बोनी कपूर या शोमध्ये पोहचले होते.

सोनी चॅनलवर प्रसारित होणार 'कपिल शर्मा शो' वडिलांची आणि मुलगी धमाल करताना दिसणार आहेत. शोमध्ये कपिलची ऑन स्क्रिन फॅमिली दिवगंत अभिनेत्री श्रीदेवी यांना म्यूझिक ट्रिब्यूटदेखील देताना दिसणार आहेत. जान्हवीदेखील कपिलची फॅमिलीसोबत आपल्या आई श्री देवीचं गाणं 'हवा हवाई'वर थिरकताना दिसणार आहे.

बोनी यांनी जान्हवीचा बाथरूम सीक्रेट केलं शेअर
सोनीने अजून एक नवा प्रोमो शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये बोनी कपूर आपल्या लाडक्या मुलगी जान्हवी कपूरचे पोल खोलताना दिसणार आहे. बोनी कपूर सांगतात की, ते जेव्हाही जान्हवीच्या रूममध्ये जातात तेव्हा कपडे नेहमी विखुरलेले असतात. टूथपेस्टचं झाकणही उघडं राहतं. एवढंच नाही तर बोनी कपूर जे सांगतात ते ऐकून जान्हवीही लाजली. ''सुदैवाने, ती स्वत: फ्लश करते,'' बोनी म्हणतात. हे ऐकून जान्हवी रागाने ओरडते आणि 'पापा' म्हणते. तिच्या चेहऱ्यावर एंबेरेसमेंट स्पष्ट दिसत आहे.

जान्हवी कपूरचा आगामी सिनेमा मिली ४ नोव्हेंबरला मोठ्या पडद्यावर रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. खास गोष्ट ही आहे की, जान्हवीची ही पहिलीच फिल्म आहे ज्यात ती तिच्या वडिलांसोबत काम करत आहे. बोनी कपूर हे या सिनेमाचे निर्माते आहेत. हा सिनेमा पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत एवढं मात्र नक्की.