अरिजितने मुंबईत खरेदी केले एक- दोन नव्हे, तब्बल चार फ्लॅट

किंमत वाचून धक्काच बसेल

Updated: Feb 10, 2020, 01:26 PM IST
अरिजितने मुंबईत खरेदी केले एक- दोन नव्हे, तब्बल चार फ्लॅट  title=
अरिजित सिंग

मुंबई : मायानगरी, स्वप्ननगरी अशा अनेक नावांनी मुंबई हे शहर ओळखलं जातं. दररोज नजाणो किती स्वप्न उराशी बाळगून या शहराच्या दिशेने अनेकजण वाटचाल करतात. काहीजणांना हे शहर आपलसं करतं, तर काही मात्र या झगमगाटापासून दूर जातात. अशा या शहरात बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक अरिजित सिंग याने अखेर स्वत:चं घर घेतलं आहे. 

अरिजितने एक- दोन नव्हे, तर तब्बल चार फ्लॅट खरेदी केले आहेत. मुंबईतील वर्सोवा येथे त्याने हे फ्लॅट खरेदी केले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार अरिजितने एकाच इमारतीमध्ये या चारही फ्लॅटची खरेदी केले आहेत. मुंबईतील काही उच्चभ्रू भागांपैकी एक अशा सात बंगला परिसरातील एका सदनिकेमध्ये अरिजितने हा नवा आशियाना खरेदी केला आहे. 

२२ जानेवारीलाच त्याने या घरांची रितसर नोंदणी केल्याचं म्हटलं जात आहे. आता मुंबईत एक घर खरेदी करणं ही काही सोपी बाब नाही, हे सर्वच जाणतात. अरिजितनेही या शहरात घरं खरेदी करण्यासाठी घसघशीत किंमत मोजली आहे. त्याच्या फ्लॅटमधील एकाची किंमत १ कोटी ८० लाख इतकी आहे. तर, ७० चौरस मीटरच्या दुसऱ्या फ्लॅटची किंमत २ कोटी ४० लाख रुपये इतकी आहे. ८० चौरस मीटरच्या आणखी एका फ्लॅटसाठी त्याने २ कोटी ६० लाख रुपये, तर ७० चौरस मीटरच्या चौथ्या फ्लॅटसाठी त्याने अडीच कोटींची रक्कम मोजली आहे. चारही फ्लॅटसाठी त्याने जवळपास ९ कोटी रुपये मोजले आहेत. 

पाहा : मनोहर जोशींची नात कलाविश्वात भलतीच चर्चेत

सहसा सेलिब्रिटी अमुक एका इमारतीमध्ये राहत असल्यास ते काही कारणांस्तव त्या इमारतीच्या मजल्यावरील सर्वच फ्लॅट खरेदी करतात. अरिजितनेही याच कारणास्तव एक- दोन नव्हे तर, थेट चार फ्लॅट खरेदी केले आहेत.