मुंबई : हिंदी कलाजगताची संपूर्ण जगभरात ख्याती आहे. फक्त चित्रपटच नव्हे, तर या जगतामध्ये कलाकारांमध्ये असणारी नातीसुद्धा कायमच चर्चेचा विषय ठरतात. चित्रपटसृष्टीमध्ये असणाऱ्या काही कलाकारांची नाती ही जेव्हा जगासमोर आली, त्यावेळी संपूर्ण चाहतावर्ग थक्क झाला होता.
असंच एक नातं होतं, अभिनेता संजय दत्त आणि अभिनेत्री टीना मुनीम हिचं. टीना सध्या देशातील सर्वात श्रीमंत कुटुंबाची सून आहे. (Sanjay Dutt Actor )
मुकेश अंबानी यांचे बंधू, अनिल अंबानी यांच्याशी टीनानं लग्न केलं. पण, याआधी अंबानी कुटुंबाच्या याच सुनेचं नाव संजुबाबाशी जोडलं गेलं होतं.
त्यांचं नातं, लग्नाच्या वळणापर्यंत येऊन पोहोचलं. पण, तसं होऊ शकलं नाही.
संजुबाबाच्या आयुष्यात आतापर्यंत अनेक अभिनेत्री आल्या. पण, टीना मुनिम हिच्यावर त्याचा फार जीव होता.
पण, संजय दत्तला लागलेल्या वाईट सवयी आणि त्याला या साऱ्याच्या अधीन जाताना पाहून टीना पुरती हादरली. ज्याच्यावर प्रेम केलं तोच असा उध्वस्त होत असल्याचं पाहताना तिला फार वेदना झाल्या.
अंमसी पदार्थ, त्याचा संजुबाबावर झालेला परिणाम आणि त्यातच त्याचं भान हरपणं हे सर्वकाही टीनाला धक्का देणारं होतं. त्यातच पुढे संजुबाबा काही अशा प्रकरणांमध्ये अडकला ज्यातून बाहेर येण्यासाठीसुद्धा त्याला फार अडचणींना सामोरं जावं लागलं.
परिणामी तिनं संजुबाबापासून दुरावा पत्करला. अंबानी कुटुंबातील लहान मुलगा, म्हणजेच अनिल अंबानी यांच्याशी तिनं लग्नगाठ बांधत वैवाहिक आयुष्याचा स्वीकार केला.