बॉलिवूड कलाकारांची सरोज खान यांना आदरांजली

सरोज खान यांच्या जाण्याने कलाविश्वात शोककळा...

Updated: Jul 3, 2020, 12:18 PM IST
बॉलिवूड कलाकारांची सरोज खान यांना आदरांजली title=
फोटो सौजन्य : Instagram

मुंबई : बॉलिवूडमध्ये एकामागोमाग एक धक्के बसत आहेत. बॉलिवूडने आज आणखी एक स्टार गमावला आहे. बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांचं कार्डियेक अरेस्टने आज निधन झालं. त्या 71 वर्षांच्या होत्या. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडने एक मोठा हिरा गमावला असल्याची भावना व्यक्त होत आहे. सरोज खान यांच्या जाण्याने कलाविश्वात शोककळा पसरली आहे. 

सरोज खान यांनी 200 चित्रपटांतून जवळपास 2000 गाण्यांसाठी जबरदस्त कोरिओग्राफी केली आहे. त्यांनी कोरिओग्राफ केलेल्या अनेक गाण्यांच्या स्टेप्स आजगी तितक्याच प्रसिद्ध आहेत. सरोज खान यांच्या जाण्याने अनेक सेलिब्रिटींनी दु:ख व्यक्त केलं असून त्यांच्या आठवणीत काही पोस्टही सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.

सरोज खान आणि माधुरी दिक्षित यांनी बॉलिवूडला अनेक हिट गाणी दिली आहेत. माधुरीने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अक्षय कुमारनेही सरोज यांच्या जाण्याने बॉलिवूडमध्ये मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली आहे. 

रेमो डिसूजा, अनुपम खेर, सनी लिओनी, शिल्पा शेट्टी, अमिताभ बच्चन, कंगना रानौत यांनी सरोज यांच्या जाण्याने शोक व्यक्त केला आहे.