रणबीर कपूरचा फोन नंबर हवाय?

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हा अभिनेता म्हणजे अनेक तरुणींचं क्रश. 

Updated: Sep 7, 2021, 04:21 PM IST
रणबीर कपूरचा फोन नंबर हवाय?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई :  रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हा अभिनेता म्हणजे अनेक तरुणींचं क्रश. रणबीरच्या पदार्पणापासूनच त्याच्या फिमेल फॅन्सची संख्या अनेकांनाच थक्क करणारी होती. अशा या अभिनेत्याला अनेकिंनी गळ्यातील ताईत केलं. रणबीरसोबत एक फोटो काढण्यापासून ते अगदी थेट त्याचा फोन नंबर मिळतो का, इथपर्यंतही चाहत्यांनी आटापिटा केला. 

रणबीरचा फोन नंबर मिळणं तसं कठीण. पण, त्याच्याच कुटुंबातील एका व्यक्तीनं स्वत:च्या फायद्यासाठी जवळपास त्याचा फोन नंबर लीक करण्याचं पाऊल उचललंच होतं. हा कारनामा करणारी व्यक्ती म्हणजे रणबीरची भाची. 

खुद्द रणबीरची बहीण रिद्धीमा हिनं याबाबतचा खुलासा केला. 'द कपिल शर्मा शो' या कार्यक्रमात रिद्धीमा आणि नीतू कपूर यांनी हजेरी लावली होती. त्याचवेळी रिद्धीमानं हा खुलासा केला. 

रणबीरची बहीण असल्यामुळं कधी तुझ्या मैत्रीणींनी त्याचा नंबर वगैरे विचारला का? असं कपिलनं रिद्धीमाला विचारलं. ज्याचं उत्तर देत तिनं मुलीचीच पोलखोल केली. 'मैत्रीणी नाही, पण मुलीनंच एकदा विचारलं होतं. तिला शाळेत कॅप्टन बनायचं होतं. तर, मतं मिळवण्यासाठी तिनं मला विचारलेलं, रणबीरचा नंबर देऊ का मुलींना मला मतं मिळतील.'

रिद्धीमानं असं न करण्याची ताकीद मुलीला दिली आणि तिनं रणबीरचा नंबर आजपर्यंत कोणालाही दिला नाही. जर, तिनं हा नंबर तिच्या मैत्रिणींना दिला असता, तर पुढं काय झालं असतं याबाबत काही वेगळं सांगण्याची गरजच नाही.