'विकी डोनर' फेम अभिनेत्याचं कॅन्सरमुळं निधन

एक वाईट बातमी 

Updated: Sep 24, 2020, 08:41 AM IST
'विकी डोनर' फेम अभिनेत्याचं कॅन्सरमुळं निधन  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : गेल्या काही काळामध्ये अनेक कलाकारंनी या जगाचा निरोप घेतला. कलाकारांच्या जाण्यानं त्यांची पोकळी भरुन निघत नाही, तोच चित्रपट जगताततून आणखी एक वाईट बातमी आली आहे. 

बॉलिवूड चित्रपट 'विकी डोनर' फेम, अभिनेता भूपेश पांड्या यांचं निधन झालं आहे. फुफ्फुसाच्या कर्करोगामुळं त्यांचं निधन झाल्याचं वृत्त आहे. पांड्या राष्ट्रीय नाट्य विद्यालय अर्थात एनएसडीचे माजी विद्यार्थी होते. 

एनएसडीच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुनच त्यांच्या निधनाबाबतची माहिती देण्यात आली. 'NSD चे (२००१ बॅच) माजी विद्यार्थी भूपेश कुमार पांड्या यांच्या निधनाचं वृत्त अतिशय वाईट आहे. त्यांना एनएसडीकडून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो', असं या ट्विटमध्ये लिहिण्यात आलं. 

 

मनोज बायपेयी आणि गजराज राव यांसारख्या कित्येक कलाकारांनी पांड्या यांच्या निधनाबाबत दु:ख व्यक्त केलं. 'विकी डोनर' आणि अशा अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारण्यासोबतच 'हजारों ख्वाहिशे ऐसी', 'डेल्ही क्राईम', 'गांधी टू हिटलर' यांसारख्या मोठ्या कलाकृतींमध्येही काम केलं होतं.