'छम्मक छल्लो' फेम गायक एकॉन वसवतोय स्वत:चं शहर

....त्याच्या शहरात असणार या सुविधा

Updated: Jan 20, 2020, 02:10 PM IST
'छम्मक छल्लो' फेम गायक एकॉन वसवतोय स्वत:चं शहर  title=

मुंबई : सेलिब्रिटी ही अनेकदा त्यांच्या कलेसोबतच इतरही अनेक कारणांमुळे ओळखले जातात. याच कलाकारांपैकी एक नाव म्हणजे गायक AKON. शाहरुख खान आणि करीना कपूर खान स्टारर 'रा वन' या चित्रपटात एकॉनने 'छम्मक छल्लो' हे गाणं अनोख्या अंदाजात सादर केलं होतं. 

एकॉनच्या याच अंदाजामुळे त्याच्या या गाण्याला कमालीची लोकप्रियता मिळाली होती. असा हा गायक आता त्याच्या कोणत्या गाण्यामुळे नव्हे, तर एका अनोख्या निर्णयामुळे चर्चेत आहे. हा निर्णय म्हणजे एक वेगळं शहरच वसवण्याचा. 

दक्षिण आफ्रिकेमध्ये तो स्वत:चं शहर वसवणार असल्याचा आनंद एकॉनने ट्विटर करत व्यक्त केला. 'एकॉन सिटी'चा कागदोपत्री व्यवहार पूर्ण झाल्याचं त्याने ट्विट करत म्हटलं. माध्यमांच्या माहितीनुसार सेनेगलमध्ये हे शहर वसवलं जात आहे. या निमित्ताने त्याचं स्वप्न पूर्ण होत असल्याचं म्हटलं जात आहे. 

VIRAL VIDEO : लग्नसोहळ्यात पाहायला मिळाला 'या' जोडीचा सुरेल अंदाज

सूत्रांच्या माहितीनुसार एकॉनने यासाठी २ हजार एकरांची जमीन घेतली आहे. जिथे वेगळेच नियम लागू असतील. या शहराची आखणी करतेवेळी पर्यावरणाच्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार आहेत. जेथे एकॉन नामक डिजिटल करन्सीचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येईल. या शहरात विमानतळाचीही सुविधा असणार आहे. 

एकॉनने यापूर्वीही या शहराविषयीची माहिती दिली होती. जे साकारण्यासाठी दहा वर्षांचा काळ लागणार आहे. एकॉनच्या या शहराविषयी ऐकून झालात ना थक्क? 'रिदम एँड ब्लूज'च्या २०१९ यादीनुसार एकॉन हा सर्वात श्रीमंत गायक आहे. ८० मिलियन डॉलर इतकी त्याची एकूण कमाई आहे. एकॉन लाईटींग आफ्रिकाच्या प्रमुखपदी आहे. ज्या माध्यमातून १८ आफ्रिकन देशांना सौर उर्जा पुरवण्याचं काम करण्यात येतं.