मुंबई : जेव्हा बॉलिवूडमध्ये अभिनेत्री सूट किंवा साड्या घालून दिसायच्या. त्यावेळी स्कर्ट आणि हातात सिगरेट घेऊन अतिशय बोल्ड अंदाजाच परवीन बाबीची एन्ट्री झाली. ती एन्ट्री देखील अशी झाली की, आजतागयात त्यांना कुणी विसरू शकलेलं नाही. 'अमर, अकबर एँथोनी', 'नमक हलाल' आणि 'शान' सारख्या सिनेमातून परवीन बाबी यांनी नाव कमावलं आहे. 20 जानेवारी 2005 रोजी पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने जाणून घ्या त्यांच्या खास गोष्टी
या बिन्धास्त अभिनेत्रीला TIME मॅगझीनच्या कव्हरपेजवर जागा मिळाली होती. यावरूनच अंदाज लावू शकतो की, त्यांचा दर्जा किती मोठा होता.
परवीन बाबींचा गुजरातच्या जूनागढमध्ये जन्म झाला. मॉडेलिंगच्या दिवसांमध्ये त्यांनी अहमदाबादच्या सेंट झेविअर्स कॉलेजमध्ये आपलं शिक्षण पूर्ण करत होत्या. याचदरम्यान निर्माता-दिग्दर्शक बीआर इशारा यांची नजर परवीन बाबींवर पोहोचली. त्यावेळी परवीन बाबी यांनी स्कर्ट घातला असून हातात सिगरेट होती. निर्माते तेव्हा प्रभावित झाले आणि त्यांनी तात्काळ सिनेमाकरता विचारलं.
परवीन बाबी यांनी बॉलिवूडमध्ये सलीम दुर्रानीसोबत 'चरित्र' सिनेमात काम केलं होतं. पण ओळख मात्र अमिताभ बच्चन यांच्या 'मजबूर' सिनेमातूनच मिळाली. यानंतर परवीन बाबी यांनी कधी वळून मागे पाहिलं नाही. दीवार', 'अमर अकबर एँथोनी', 'काला पत्थर', 'सुहाग', 'कालिया', 'क्रांति', 'नमक हलाल', 'आहिस्ता आहिस्ता' सारख्या सुपरहिट सिनेमांमधून समोर आल्या.
परवीन यांच लग्न झालं मात्र त्यांच अनेक विवाहित पुरूषांसोबत संबंध होते. यामध्ये महेश भट्ट, कबीर बेदी आणि डॅनी डेनजोगपा यांचा देखील समावेश आहे. यामुळेच परवीन यांच खासगी आयुष्य अतिशय खराब झालं. विवाहित पुरूषांसोबत संबंध असल्यामुळे त्या खासगी आयुष्यात कधी स्थिरावू शकल्या नाहीत. शेवटपर्यंत त्या ऐकट्याच राहिल्या.
याच दरम्यान अमिताभ बच्चन यांच्यासोबतही संबंध असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. अमिताभ यांच्यावर तिला मारल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र नंतर लक्षात आलं की, आजारपणामुळे परवीन बाबी यांच्यावर परिणाम झाला आहे. आजारपणामुळेच परवीन बाबी अमिताभ, डॅनी, महेश भट्ट यांना घाबरू लागल्या होत्या.
महेश भट्ट यांच्यासोबत लिव इन रिलेशनशिपमध्ये देखील परवीन बाबी राहिल्या होत्या. असं म्हटलं जातं की, महेश भट्ट यांनी परवीन बाबींना सोडून जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांच्या मागे विवस्त्र धावत सुटल्या होत्या परवीन बाबी. महेश भट्ट यांनी परवीन बाबी यांच्या जीवनावर 'वो लम्हे' सिनेमा काढला. यामध्ये कंगना आणि शाइनी आहूजाचा समावेश होता.