प्रदर्शित झाल्यानंतर 'पानिपत'मध्ये मोठा बदल

या बदलाला कारण ठरलं ते म्हणजे.... 

Updated: Dec 12, 2019, 01:59 PM IST
प्रदर्शित झाल्यानंतर 'पानिपत'मध्ये मोठा बदल  title=
पानिपत

मुंबई : वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर यांच्या 'पानिपत' Panipat या चित्रपटात अखेर काही महत्त्वाचे बदल करण्यात येण्याची बाब आता निश्चित झाली आहे, प्रदर्शनानंतर एका आठवड्याच्या आत या चित्रपटावर कात्री लागली असून, जवळपास अकरा मिनिटांची दृश्य चित्रपटातून वगळण्यात आली आहेत. 

जाट समुदायाकडून चित्रपटाला होणारा विरोध पाहता, निर्मात्यांनी 'पानिपत'मधील आक्षेपार्ह दृश्य हटवण्याची तयारी दाखवल्याची माहिती राजस्थान सरकारशी संलग्न सूत्रांनी दिली आहे. 'चित्रपट वितरकांनी आमच्याशी संपर्क साधला आणि ते वादग्रस्त भागावर कात्री मारण्यासाठी तयार आहेत, असं (गृहखात्याच्या) अतिरिक्त मुख्य सचिव राजीव स्वरूप यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीत सांगितलं. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार चित्रपटाची संकलित फीत सेन्सॉरकडेही पाठवण्यात आली. 
निर्मात्यांशी संलग्न सूत्रांच्या माहितीनुसार महाराजा सूरजमल जी यांचा उल्लेख असणारी दृश्य चित्रपटातून वगळण्यात आली असून चित्रपटाची वेळ मर्यादा आता ११ मिनिटांनी कमी झाली आहे. ज्याला सेन्सॉरकडूनही प्रमाणित करण्यात आलेलं आहे. 

राजस्थानमध्ये चित्रपटाला होणारा विरोध पाहता अनेक ठिकाणी 'पानिपत' दाखवण्यावर निर्बंध लावण्यात आले होते. शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यांमध्ये माहाराजा सूरजमल याची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्यामुळे अर्जुन कपूर, क्रिती सेनन आणि संजय दत्त यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचा मोठ्या प्रमाणात विरोध केला गेला होता. काही ठिकाणी चित्रपटगृहांमध्ये तोडफोडही करण्यात आली होती. 

...म्हणून गोवारिकरांच्या 'पानिपत'विरोधात निदर्शनं

पर्यटनमंत्री विश्वेंद्र सिंह, शिक्षण मंत्री गोविंद सिंह दोतासारा, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी या चित्रपटात भरतपूरचे महाराज सूरजमल यांची व्यक्तीरेखा चुकीच्या पद्धतीने साकारण्यात आल्याचं म्हणत नाराजी व्यक्त केली होती. यापूर्वी संजय लीला भन्साळी या चित्रपटालाही राजस्थानमधील काही समुदायांच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागला होता. ऐतिहासिक चित्रपटांना होणारा विरोध आणि त्याच्या पडसादांचं हे आणखी एक उदाहरण आहे.