...म्हणून गोवारिकरांच्या 'पानिपत'विरोधात निदर्शनं

...या समुदायाकडून चित्रपटाचा विरोध

Updated: Dec 9, 2019, 12:19 PM IST
...म्हणून गोवारिकरांच्या 'पानिपत'विरोधात निदर्शनं   title=
पानिपत

भरतपूर : आशुतोष गोवारिकर दिग्दर्शित 'पानिपत' Panipat हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पहिल्याच दिवसापासून या चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये कुतूहल निर्माण केलं. एकिकडे बॉक्स ऑफिस कमाईच्या बाबतीत हा चित्रपट कितपत मजल गाठतो हे पाहत असतानाच आता या चित्रपटाला जाट समुदायाकडून विरोध करण्यात येत आहे. 

शनिवारपासूनच या चित्रपटाविरोधात समुदायाने आवाज उठवला असून, आशुतोष गोवारिकर यांच्या पुतळ्यातं दहन केलं. शिवाय 'हिंदुस्तान टाईम्स'च्या वृत्तानुसार त्यांनी चित्रपटाचावर बंदी आणण्याचीही मागणी केली आहे. चित्रपटातून वास्तवाची मोडतोड करत काही प्रसंग दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे अशा दृश्यांवर कत्री मारण्याची मागणी त्यांच्याकडून येत आहे. असं न केल्यास हा विरोध आणखी तीव्र होण्याचा इशारा त्यांच्याकडून देण्यात आला आहे. 

पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटात अभिनेता Arjun Kapoor अर्जुन कपूर (सदाशिव राव भाऊ), अभिनेत्री क्रिती सेनन Kriti (पार्वती बाई) आणि अभिनेता संजय दत्त (अहमद शाह अब्दाली) यांच्या मुख्य भूमिका आहेत. याच चित्रपटातून पानिपतच्या लढाईपूर्वीचा काही काळ, घडामोडीदी दाखवण्य़ात आल्या आहेत. ज्यामध्ये भरतपूरचे राजा महाराजा सूरजमल यांची प्रतिमा एक लोभी शासक म्हणून दाखवण्यात आली आहे. ज्यांचा डोळा आग्र्याच्या किल्लावर असतो आणि याच कारणास्तव ते पानिपतच्या युद्धात मराठ्यांची मदत करण्याच्या शब्दावर दगा देतात. 

Panipat Movie Review : 'अर्जुना'च्या 'पानिपत'ची यशस्वी 'क्रिती'

इतिहासकार महेंद्रसिंह सिकरवार यांच्या भरपूरच्या इतिहासावर भाष्य करण्यात आलेल्या पुस्तकात नमूद केल्यानुसार पानिपतच्या युद्धापूर्वीच आग्र्याचा किल्ला हा सूरजमल यांच्या साम्राज्यात आला ओहात. शिवाय ते फक्त ब्रज भाषा बोलत होते. पण, चित्रपटात मात्र ते वेगळी भाषा बोलताना दिसतात. सूरजमल यांच्या तीन अटी सदाशिवराव भाऊंनी न स्वीकारल्यामुळेच त्यांनी पानिपतच्या युद्धात मराठ्यांना मदत दिली नाही. 

सिकरवार यांच्या माहितीनुसार सदाशिव राव भाऊ यांच्या निधनानंतर भरतपूर सैन्याच्या अंतर्गत येणाऱ्या राज्यांमध्ये पानिपतदरम्यान, मराठा साम्राज्याचील महिला आणि सैनिकांना आसरा देण्यात आला होता. सध्याच्या घडीलाही महाराष्ट्रात अशी ५० गावं आहेक जिथे जाट समुदायाची वस्ती आहे. 

जाट समुदायातील नेते नेम सिंह यांच्या इशाऱ्यानुसार त्यांनी तातडीने चित्रपटात आवश्यक ते बदल करण्याची मागणी केली आहे. शिवाय असं न केल्यास येत्या काळात ते राजस्थान, उत्तर प्रदेस, हरियाणा आणि इतर काही राज्यांतील जाट समुदायास विरोधासाठी एकवटणार आहेत. तेव्हा आहा चित्रपटाला होणाऱ्या या विरोधाला नेमकं कोणतं वळण मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.