पाहा कसा होता दीपिकापासून 'मालती' होण्यापर्यंतचा प्रवास...

जेव्हा प्रथमच दीपिका, मालतीच्या रुपात लक्ष्मी अग्रवालसमोर गेली...   

Updated: Jan 18, 2020, 03:50 PM IST
पाहा कसा होता दीपिकापासून 'मालती' होण्यापर्यंतचा प्रवास...  title=
हे रुप काहीसं म्हणण्यापेक्षा बरंच वेगळं होतं.

मुंबई : काही संवेदनशील मुद्द्यांवर प्रभावीपणे भाष्य करत त्याचं सुरेख प्रदर्शन मेघना गुलजार यांनी त्यांच्या चित्रपटांतून मांडलं आहे. यामध्येच त्यांच्या छपाक या चित्रपटाचीही भर पडली आहे. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातून दीपिका एका वेगळ्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आली. हे रुप काहीसं म्हणण्यापेक्षा बरंच वेगळं होतं. 

कारण, हे रुप होतं एका ऍसिड हल्ल्यातून बचावलेल्या तरुणीचं. लक्ष्मी अग्रवाल या ऍसिड हल्ला पिडीतेच्या जीवनातील काही प्रसंगांचा आधार घेत 'छपाक'चं कथानक साकारण्यात आलं आहे. ज्यामध्ये दीपिकाने 'मालती' नावाचं पात्र साकारलं आहे. 

दीपिकाने साकारलेली 'मालती' ही खुद्द दीपिका आणि लक्ष्मीपेक्षाही पूर्णपणे वेगळी आहे. हे नुकत्याच प्रदर्शित करण्यात आलेल्या एका व्हिडिओतून लक्षात येत आहे. ज्या व्हिडिओमध्ये 'प्रोस्थेटीक्स' मेकअपच्या पद्धतीने कशा प्रखारे एका ख्यातनाम मेकअप आर्टीस्टच्या मेहनतीने दीपिकाचा हा लूक साकारण्यात आला याचा उलगडा करण्यात आला आहे. 

पाहा उणे ४० अंश तापमानात भारतीय सैन्यातील जवान कसं करतात देशाचं रक्षण 

चेहऱ्यावर अत्यंत सहसीलपणे तासनतास मेकअप, किंबहुना एका वेगळ्या चेहऱ्याचा थर घेऊन वावरणं हे पाहणं जितकं सोपं वाटतं प्रत्यक्षात मात्र ते तितकंच कठीण आहे, हे दीपिकाच्या या चित्रपटातून स्पष्ट होतं. फक्त मेकअप झाला म्हणजे अमुक एका भूमिकेसाठी कलाकार तयार असं गरजेचं नसतं. त्यासाठी भावनिक पातळीवरही बंध तयार होणं गरजेचं असतं. दीपिका आणि मालतीचं असंच नातं छपाक या चित्रपटातून पाहायला आलं. मेघना गुलजार यांना या चित्रपटाकडून आणि दीपिकाकडून नेमकं काय हवं होतं, याचं चित्र त्यांना स्पष्ट होतं. याच चित्राच्या आधारावर साकारला गेला, 'छपाक'.