मुंबई : लोकांना त्यांच्या उत्तम स्वास्थ्याप्रती जागृत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय खेळ दिवसाच्या मुहूर्तावर 'फिट इंडिया' अभियानाचा शुभारंभ केला आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकार आपल्या फिटनेसबाबत अॅक्टिव्ह आहेत. अशातच पंतप्रधान मोदींच्या या अभियानच्या समर्थनार्थ बॉलिवूडचे अनेक कलाकार पुढे आले आहेत.
अभिनेत्री शिल्पा शेट्टी या अभियानात आधीपासूनच जोडली गेली आहे. शिल्पा शेट्टीची केंद्र सरकारच्या फिट इंडिया Fit India अभियानासाठी असलेल्या कमेटीमध्ये सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
I am happy to be on the advisory committee of the Fit India movement envisaged by our Honourable PM.
Hoping to lend my support in finding fun, easy ways to make every Indian fit and making this movement/vision a success.@PMOIndia @KirenRijiju @Media_SAI— SHILPA SHETTY KUNDRA (@TheShilpaShetty) August 23, 2019
शिल्पानंतर आता करण जोहर, पायल रोहतगी, मल्लिका शेरावत, सचिन तेंडुलकर अशा अनेक सेलिब्रिटींनी या अभियानच्या समर्थनार्थ त्यांचे फोटो, व्हिडिओ शेअर केले आहेत.
करण जोहरने पंतप्रधान मोदींना या अभियानासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Congratulations to our honourable PM @narendramodi & sports minister @kirenrijiju for launching the Fit India Movement on 29th August. I’m sure this will inspire all Indians in finding easy and fun ways to adapt a fit and healthy lifestyle #FitIndiaMovement
— Karan Johar (@karanjohar) August 29, 2019
पायल रोहतगी, मल्लिका शेरावत, सचिन तेंडुलकर यांनीही अभियानसंबंधी व्हिडिओ शेअर केला आहे.
A day out with friends is always fun, especially when it involves sports. You get to challenge each other, and also stay FIT! Had a nice time catching up with @vinodkambli349, Jagdish & Atul.
What sports are you playing with your friends?#FitIndiaMovement #NationalSportsDay pic.twitter.com/JnLz16u3He— Sachin Tendulkar (@sachin_rt) August 29, 2019
Doing yoga everyday keeps me very fit #FitIndiaMovement #FitIndia #yoga #yogaeveryday pic.twitter.com/QPWjYgZzap
— Mallika Sherawat (@mallikasherawat) August 29, 2019
पंतप्रधान मोदींकडून दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये फिट इंडिया अभियान लॉन्च करण्यात आलं. सर्वांनी फिट राहणं गरजेचं आहे. प्रत्येकाच्या कुटुंबात व्यायाम, फिटनेस हे दररोजच्या जीवनातील विषय बनले पाहिजेत, असं मोदी यावेळी म्हणाले.