४० शी ओलांडूनही अविवाहीत आहेत बॉलिवूडच्या या अभिनेत्री!

बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा मोसम सुरु होता.

Updated: May 15, 2018, 02:47 PM IST
४० शी ओलांडूनही अविवाहीत आहेत बॉलिवूडच्या या अभिनेत्री! title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा मोसम सुरु होता. अलिकडेच अभिनेत्री सोनम कपूर, नेहा धुपिया आणि त्यानंतर हिमेश रेशमिया हे कलाकार विवाहबद्ध झाले. मात्र वयाची ४० ओलांडली तरी या अभिनेत्री अविवाहीतच आहेत. पहा कोण आहेत या अभिनेत्री...

या यादीत पहिले नाव आहे अभिनेत्री फातिमा हाश्मी म्हणजे तब्बू.  तब्बूचा जन्म ४ नोव्हेंबर १९७१ मध्ये आंध्रप्रदेशातील हैद्राबादमध्ये झाला. १९९४ मध्ये तिने आपल्या करिअरला सुरुवात केली. अजूनही ती सातत्याने काम करत आहे. आपल्या २५ वर्षांच्या करिअरमध्ये तिने २२ सिनेमांमध्ये काम केले आहे. ४६ वर्षांची ही अभिनेत्री अजूनही अविवाहीतच आहे. दक्षिणेतील अभिनेता नागार्जुनसोबत तिचे नाव जोडले गेले होते.

अभिनेत्री तब्बू करतेय पुनरागमन या सिनेमातून

दुसरे नाव आहे विश्वसुंदरी सुष्मिता सेनचे. १९९६ मध्ये बॉलिवूडमध्ये तिने पर्दापण केले. २२ वर्षात तिने ३५ सिनेमातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. १९ नोव्हेंबर १९७५ मध्ये हैद्राबादमध्ये तिचा जन्म झाला. ४२ वर्षांची ही अभिनेत्री अविवाहीत असून पाकिस्तानी क्रिकेटर वसीम अक्रमसोबत तिचे नाव जोडले गेले होते.

इंस्टाग्रामवर सुष्मिता सेनने शेअर केला हॉट लूक

या यादीतील शेवटचे नाव आहे अभिनेत्री अमिषा पटेलचे. २००० मध्ये आलेल्या मेगाब्लॉकबस्टर सिनेमा कहो ना प्यार है मधून तिने बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. त्यानंतर तिने तेलगू आणि तमिळ सिनेमातही काम केले. अमिषा पटेलचा जन्म ९ जून १९७५ मध्ये जाला. १८ वर्षात अमिषाने ३३ सिनेमांमध्ये काम केले. अमीषा तिचे बोल्ड फोटोज सोशल मीडियावर पोस्ट करत असते. त्यावरुन अनेकदा ती ट्रोलही होते. 

अमिषा पटेलचे हे खास फोटो पाहून फॅन्स म्हणाले WOW