Diwali आधीच सुष्मिता सेनच्या घरी लक्ष्मीचं आगमन... रुग्णालयातून पहिलावहिला फोटो पोस्ट

खुद्द सुष्मिताच आई झालीये ?

Updated: Nov 1, 2021, 04:20 PM IST
Diwali आधीच सुष्मिता सेनच्या घरी लक्ष्मीचं आगमन... रुग्णालयातून पहिलावहिला फोटो पोस्ट  title=
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : एकिकडे दिवाळीची लगबग सुरु आहे, कुठे रोषणाईची कामं शेवटच्या टप्प्यात आहेत. तर कुठे फराळात काही उरलंय का यावर नजर टाकली जात आहे. अभिनेत्री सुष्मिता सेन हिच्या घरी मात्र आनंदाचं वेगळंच रुप पाहायला मिळत आहे. हे रुप आहे एका चिमुकलीचं, या अभिनेत्रीच्या घरी आलेल्या साक्षात लक्ष्मीचं. 

सुष्मितानंच सोशल मीडियावर रुग्णालयातून या पहिल्यावहिल्या क्षणांचा फोटो पोस्ट करत हा आनंद चाहत्यांशी शेअर केला. तिनं हा फोटो शेअर केल्यानंतर अनेकांनाच पहिल्यांदा पडलेला प्रश्न म्हणजे, खुद्द सुष्मिताच आई झालीये ?

तर, तसं नाहीये. सुष्मिताचा भाऊ राजीव सेन याच्या पत्नीनं सोमवारी सकाळी एका गोंडस मुलीला जन्म दिला. ज्यामुळं सुष्मिता आता आत्या झाली आहे. 

सेन कुटुंबात दिवाळीच्या आधीच लक्ष्मी आल्याचं म्हणत तिनं या मंगलपर्वासाठी देवाचे आभार मानत आनंद व्यक्त केला. तिनं डॉक्टरांचेही आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rajeev Sen (@rajeevsen9)

तिथं राजीव सेन यानंही सोशल मीडियावर लेकीची पहिलीवहिली झलक सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला आणली. सोबतच पत्नीची तब्येतही ठीक असल्याचं त्यानं सांगितलं. 

राजीवनं शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्याची पत्नी, चारु हिच्या डोळ्यात आनंदाश्रू आल्याचंही दिसत आहे. राजीव आणि चारूच्या जीवनातील ही पहाट त्यांना खूप आनंद देणारी ठरणार अशाच शब्दांत सध्या चाहते व्यक्त होताना दिसत आहेत.