'अडल्ट स्टारची निवृत्ती म्हणजे....' म्हणणाऱ्यांना सनीने सुनावलं

सोशल मीडियावर या मुलाखतीचा व्हिडिओ अनेकांनीच शेएअरही केला आहे. 

Updated: Apr 24, 2019, 04:58 PM IST
'अडल्ट स्टारची निवृत्ती म्हणजे....' म्हणणाऱ्यांना सनीने सुनावलं  title=
सनी लिओनी

मुंबई : अभिनेत्री सनी लिओनी आणि तिच्याभोवती असणारी चाहत्यांची गर्दी काही नवी नाही. सोशल मीडिया पोस्ट म्हणू नका किंवा मग एखादा कार्यक्रम; सनीची हजेरी नेहमीच चर्चेचा विषय ठरते. सध्या अशीच चर्चा सुरु आहे तिच्या एका मुलाखतीची. ज्या मुलाखतीत भूतकाळाती आयुष्यावर प्रकाशझोत टाकत आणि काही अनपेक्षित प्रश्नांची उत्तरं देत सनीने तिचा दृष्टीकोन सर्वांपुढे ठेवला आहे. सोशल मीडियावर या मुलाखतीचा व्हिडिओ अनेकांनीच शेएअरही केला आहे. 

अरबाज खाच्या 'पिंच' या कार्यक्रमात सनीने त्याच्या काही प्रश्नांची उत्तर देत सोशल मीडियावर तिची खिल्ली उडवणाऱ्यांनासुद्धा सडेतोड उत्तर दिल्याचं पाहायला मिळालं. एका पॉर्न स्टारला त्या क्षेत्रातून निवृत्ती घ्यायची असल्याच त्या भारतीय चित्रपटसृष्टीची वाट धरतात असं म्हणत तिला ट्रोल करण्यात आलं होतं. यालाच उत्तर देत सनी म्हणाली, या ट्रोलचे आभार मानत सनीने त्यावर उपरोधिक प्रतिक्रिया दिली. 'मला माझ्या निवृत्तीचा हा बेत फार आवडतोय. मी काहीही करत नसले तरीही. मी येणाऱ्या प्रत्येक दिवशी काम करत आहे', असं ती म्हणाली. अडल्ट स्टार म्हणून होणाऱ्या टीका कधीच मनावर घेत नसल्याचंही तिने या मुलाखतीत स्पष्ट केलं. 

'अडल्ट स्टार' म्हणून या क्षेत्रात सर्वांसमोर आलेल्या सनीने २०१२ मध्ये 'जिस्म २' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतरच पुढे तिने 'बिग बॉस' या रिऍलिटी शोमध्ही सहभाग घेतला होता. पुढे सनी फार कमी काळातच प्रकाशझोतात आली. 

पॉर्न साईट्सवर येणाऱ्या बंदीचा अंदाज घेत सनीने मोठ्या शिताफीने तिच्या करिअरचा मोर्चा वळवला असं म्हणतही तिची खिल्ली उडवण्यात आली होती. त्याचविषयी उत्तर देत सनीने अत्यंत मह्त्वाची बाब सर्वांसमोर ठेवली. प्रत्येक व्यक्ती योग्य क्षणी योग्य तेच निर्णय घेण्यास प्राधान्य देते. मीसुद्धा त्या त्या क्षणी योग्य असेच निर्णय घेतले. असं म्हणत तिने आपली बाजू स्पष्ट केली.  

अनेक प्रश्नांना आणि ट्रोलर्सना उत्तर देणाऱ्या सनीचा हा अंदाज अर्थातच नवा नव्हता. तिने कधीही आपण केलेल्या कामाची खंत व्यक्त केली नाही, किंवा परिस्थितीलाही दोष दिला नाही. याच अंदाजामुळे ती चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. येत्या काळात सनी तिच्या कामांवर लक्ष केंद्रीत करत असून, काही दिवसांपूर्वीच तिने स्वत:चा कॉस्मॅटीक ब्रँडही सुरू केला आहे. त्यामुळे अभिनय, कुटुंब आणि व्यवसाय अशी तिहेरी जबाबदारी ती पार पाडताना दिसत आहे.