अशक्य, सोनमनं 'भाग मिल्खा भाग'साठी का घेतलं 'इतकं' मानधन ?

तब्बल ९ वर्षांनंतर ही बाब समोर आली आहे. 

Updated: Aug 11, 2021, 08:20 PM IST
अशक्य, सोनमनं 'भाग मिल्खा भाग'साठी का घेतलं 'इतकं' मानधन ? title=
सोनम कपूर

मुंबई : अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) हिच्याकडे बॉलिवूडची फॅशनिस्ता, म्हणून पाहिलं जातं. अफलातून फॅशन सेन्स असणारी ही अभिनेत्री सध्या बऱ्याच प्रोजेक्टमध्ये व्यग्र असून, सोबतच ती वैवाहिक आयुष्यालाही तितकंच महत्त्वं देताना दिसते. तिथं सोनम जीवाचा प्रत्येक क्षण आनंदात जगत असतानाच आता तिच्यासंदर्भातील एक गुपित अनेक वर्षांनंतर सर्वांसमोर आलं आहे. 

तब्बल ९ वर्षांनंतर ही बाब समोर आली आहे. सहसा तगडं कथानक आणि तितकीच दमदार स्टारकास्ट असणाऱ्या चित्रपटाच्या जमेची बाजू ठरते. असाच एक चित्रपट 2013 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा चित्रपट होता, 'भाग मिल्खा भाग' (bhaag milkha bhaag). फरहान अख्तरची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या या चित्रपटामध्ये सोनमनं त्याच्या ऑनस्क्रीन प्रेयसीची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांची पसंतीही मिळाली. 

दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी यासंदर्भातील खुलासा करत 'द स्ट्रेंजर इन द मिरर' या आत्मचरित्रपर पुस्तकामध्ये सोनमबाबत एक बाब स्पष्ट केली आहे. सोनमनं या चित्रपटासाठी कोणत्याही प्रकारचं घसघशीत मानधन घेतलं नव्हतं. तिनं चित्रपटासाठी अवघी टोकनची रक्कमच घेतली होती.

जिच्यासाठी प्रभुदेवाचा पत्नीपासून दुरावा, 'त्या' अभिनेत्रीचा दुसऱ्यासोबतच झाला साखरपुडा 

 

या चित्रपटामध्ये सोनमची भूमिका फार मोठी नव्हती. पण, तरीही तिनं चाहत्यांच्या मनाचा ठाव घेतला होता. या रोलसाठी ती लगेचच तयार झाली आणि अशक्य वाटत असलं तरीही हे खरंच की तिनं या भूमिकेसाठी अवघे 11 रुपये इतकीच रक्कम घेतली होती. 

सोनमच्या या निर्णयाबाबत सांगता राकेश मेहरा यांनी पुस्तकात लिहिलंय, 'तिनं फक्त 11 रुपयेच घेतले. यापूर्वी दिल्ली 6 या चित्रपटासाठीचा आमचा प्रवास सुरेख होता. तिनं मला सांगितलं होतं की चित्रीकरणासाठी 7 दिवसांचीच गरज आहे. देशाची फाळणी आणि मिल्खा सिंग यांच्या प्रवास सादर करण्यासाठी तिनं कौतुकही केलं होतं. या चित्रपटात तिला आपलं योगदान द्याचं होतं. ही खरंच खुप चांगली गोष्ट आहे. '