पती आनंद अहुजाने शेअर केला Sonam Kapoor चा कपडे बदलतानाचा व्हिडिओ

बॉलिवूडची अतिशय सुंदर अभिनेत्री सोनम कपूर तिच्या फॅशन सेन्ससाठी जितकी ओळखली जाते तितकीच ती तिच्या अभिनयासाठीही ओळखली जाते.

Updated: Sep 30, 2021, 06:36 PM IST
पती आनंद अहुजाने शेअर केला Sonam Kapoor चा कपडे बदलतानाचा व्हिडिओ title=

मुंबई : बॉलिवूडची अतिशय सुंदर अभिनेत्री सोनम कपूर तिच्या फॅशन सेन्ससाठी जितकी ओळखली जाते तितकीच ती तिच्या अभिनयासाठीही ओळखली जाते. सोनम कपूर अनेकदा तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. यासोबतच तिचा पती आनंद आहुजा देखील सोनमशी संबंधित पोस्ट अपडेट करत असतो. अलीकडेच आनंदने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर सोनमचा एक गोंडस व्हिडिओ अपलोड केला आहे. ज्या व्हिडिओवर सोनमचे चाहते लाईक आणि कमेंट करत आहेत.

हा व्हिडिओ सोनम कपूरचा पती आनंद आहुजा याने बनवला आहे. ज्यामध्ये सोनम एक लांब कोट घालण्याचा प्रयत्न करत आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सोनमला कोट घालण्यात अडचण येत आहे आणि तिने हेल्प हेल्प... आय एम स्टक ओरडताना दिसत आहे. पण आनंद मदतीसाठी पुढे येत नाही. तो फक्त मजा घेत सोनमचा व्हिडिओ शूट करतो. पतीकडून मदत न मिळाल्याबद्दल, सोनम प्रेमाने 'रिडिक्यूलस' म्हणते, तर आनंद म्हणतो 'व्हाट रिडिक्यूलस'.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यावर प्रतिक्रिया देत सोनम म्हणते, तू माझा व्हिडिओ शूट करत आहेस. यू फिल्मिंग मी, स्ट्रगलिंग विद माय कोर्ट एंड यू फिल्मिंग मी याला उत्तर देत आनंद आहुजा म्हणतो की, इथे थंडी नाही, तु नाटक करत आहेस. दोघांच्या या क्यूट केमिस्ट्रीवर चाहते देखील लाईक्स कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. याचबोरबर आनंदने इंस्टास्टोरीमध्ये देखील व्हिडिओ शेअर केला आहे.व्हिडिोमध्ये आनंदने सोनमच्या सिंपर हेअर स्टाईलचं भरभरुन कौतुक केलं आहे.