"हा अपमान आणि छळ आहे," सोनम कपूरने वडील अनिल कपूर यांचा उल्लेख करत व्यक्त केला संताप

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने (Sonam Kapoor) वडील अनिल कपूर (Anil Kapoor)यांचा उल्लेख करत केलेली Instagram पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये सोनम कपूरने आपल्याला अपमानजक आणि छळ होत असल्याचं वाटत असल्याची भावना व्यक्त केली होती.   

Updated: Feb 15, 2023, 07:15 PM IST
"हा अपमान आणि छळ आहे," सोनम कपूरने वडील अनिल कपूर यांचा उल्लेख करत व्यक्त केला संताप title=

37 वर्षीय सोनम कपूर (Sonam Kapoor) बॉलिवूडमध्ये (Bollywood) आपल्या फॅशन स्टाइलमुळे ओळखली जाते. अनिल कपूर (Anil Kapoor) यांची मुलगी असतानाही सोनमला बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करण्यात यश मिळालं आहे. सोनमला बॉलिवूडमध्ये तसं फारसं यश मिळालं नाही. पण आपलं फिटनेस, फॅशन यामुळे मात्र ती नेहमी चर्चेत राहिली. यासह तो सोशल मीडियावरही (Social Media) फार सक्रीय असते. सोनम गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडपासून दूर आहे आणि पती आनंद अहुजासह संसारात व्यग्र आहे. यादरम्यान सोनमच्या एक जुनी Instagram पोस्ट सध्या व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये तिने वडील अनिल कपूर यांचा उल्लेख करत हा अपमान आणि छळ असल्याचं म्हटलं आहे. 

नेमकं काय झालं होतं?

'टायगर जिंदा है' सारख्या सुपरहिट चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या अली अब्बार जाफरने (Ali Abbas Zafar) 2020 मध्ये आपल्या चाहत्यांना एक खुशखबर दिली होती. यावेळी त्याने आपण 'मिस्टर इंडिया 2' नावाचा चित्रपट तयार करत असल्याची घोषणा केली होती. हा चित्रपट तीन भागांमध्ये प्रदर्शित करणार असल्याचं त्याने सांगितलं होतं. अली अब्बास जाफरच्या या घोषणेमुळे 'मिस्टर इंडिया'च्या चाहत्यांना आनंद झाला होता. पण मिस्टर इंडियाची निर्मिती करणारे मात्र नाराज झाले होते. 

अली अब्बासच्या ट्वीटनंतर दिग्दर्शक शेखर कपूर (Shekhar Kapur) यांनीही ट्वीट करत ‘मिस्टर इंडिया 2’ त्या संदर्भात आपल्याला काहीच माहिती नाही नसून, आपल्याशी कोणीही चर्चा केली नसल्याचं सांगितलं होतं. शेखर कपूर यांच्या या विधानानंतर चाहत्यांना आणखी एक धक्का बसला होता. त्याचवेळी 'मिस्टर इंडिया' चित्रपटात प्रमुख भूमिका निभावणारे अनिल कपूर यांची लेक सोनमने एक पोस्ट शेअर (Sonam Kapoor Got Angry) केली होती. 

सोनम कपूरला अपमानित झाल्याची भावना

सोनम कपूरने 'मिस्टर इंडिया 2' बनवण्यासंबंधी आक्षेप नोंदवला होता तसंच अली जफरला यासंबंधी आपल्या वडिलांशी संपर्क साधणं योग्य वाटलं नसल्याचं म्हटलं. सोनम कपूरने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की "अनेक लोक मला मिस्टर इंडियाच्या रिमेकबद्दल विचारणा करत आहेत. खरं सांगायचं तर मलाही अली जफरने ट्वीट केल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून याची माहिती मिळाली आहे. जर हे सत्य असेल तर अपमानजक आणि छळ आहे. माझे वडील आणि शेखर अंकल यांनी या चित्रपटात महत्वाची भूमिका निभावली असून त्यांच्याशी कोणताही संपर्क साधण्यात आलेला नाही. मिस्टर इंडिया चित्रपटासह माझ्या भावना जोडलेल्या आहेत. बॉक्स ऑफिसच्या यशापेक्षा या भावना महत्त्वाच्या आहेत. मला वाटतं एखाद्या कलाकाराचा त्याच्या कामासाठी सन्मान केला पाहिजे, जो पहिल्या वीकेंडच्या कमाईच्या आकड्यापेक्षा मोठा असतो".