या बॉलिवूड अभिनेत्रीने गुपचूप केले लग्न!

अजय देवगनची ऑनस्‍क्रीन पत्नी अभिनेत्री श्रिया सरनने गुपचूप लग्न केले. 

Updated: Mar 17, 2018, 01:20 PM IST
या बॉलिवूड अभिनेत्रीने गुपचूप केले लग्न! title=
मुंबई : अजय देवगनची ऑनस्‍क्रीन पत्नी अभिनेत्री श्रिया सरनने गुपचूप लग्न केले. आपल्या रशियन बॉयफ्रेंडसोबत ती विवाहबद्ध झाली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा विवाहसोहळा अगदी खाजगी होता. या विवाहसोहळ्यात सेलिब्रेटीजपैकी मनोज बाजपेयी आणि त्यांची पत्नी शबाना सहभागी झाले होते.

गुपचूप लग्न

श्रिया आपल्या वैयक्तिय आयुष्यबद्दल फारसे कधी बोलत नाही. त्यामुळेच विवाहाला फक्त कुटुंबिय आणि जवळचा मित्रपरिवार उपस्थित होता. हा विवाह संपूर्णपणे हिंदू रितीरिवाजांनुसार पार पडला. विवाहास श्रियाने गुलाबी रंगाचा लेहंगा घातला होता. ट्रेड एनालिस्ट रमेश बाला यांनी देखील ट्वीट करुन या बातमीला दुजोरा दिला आहे.

अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत

सुरुवातीला श्रिया आणि एंड्रीचे उद्यपूरमध्ये डेस्टिनेशन वेडींग होणार होते. मात्र श्रियाने याला नकार दिला. गेल्या अनेक वर्षांपासून ते दोघे एकमेकांना डेट करत आहेत.

या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला

दृश्यम सिनेमात झळकलेल्या या अभिनेत्रीने यापूर्वी तामिळ, तेलगू सिनेमात काम केले आहे. २००१ मध्ये इश्‍तम या सिनेमातून तिने आपल्या करियरची सुरुवात केली. तर तुझे मेरी कसम या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पर्दापण केले.