कोरोनावर गोमुत्र पिण्याचा उपाय; वाचून अभिनेत्रीही थक्क

पाहा तिने यावर नेमकी काय प्रतिक्रिया दिली 

Updated: Mar 15, 2020, 04:22 PM IST
कोरोनावर गोमुत्र पिण्याचा उपाय; वाचून अभिनेत्रीही थक्क  title=
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच आहे. चीनपाठोपाठ इराण, इटली, भारत अशा राष्ट्रांमध्येही हा व्हायरस बलावताना दिसत आहे. दर दिवसाआड या व्हायरसच्या विळख्यात येणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. मुख्य म्हणजे सर्वत्रच या व्हायरसवरील उपचारपद्धतींचं संशोधनही वेगाने सुरु आहे. या साऱ्यामध्ये अनेकजण काही प्रतिबंधात्मक उपायही योजले जात आहेत. पण, काही उपाय मात्र चक्रावून सोडतील असेच आहेत. 

अशाच बहुविध उपायांपैकी एक म्हणजे गोमुत्र पार्टी. ऐकूनच धक्का बसला ना? बॉलिवूड अभिनेत्रीनेच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन या पार्टीविषयीचा एक फोटो पोस्ट केला आहे. जो फोटो पाहून तीसुद्धा थक्कच झाली. शिवाय तिने याविषयी कुतूहलही व्यक्त केलं. 'या पार्टीचं थेट प्रक्षेपण पाहायचं आहे. इतकंच नव्हे, तर गोमुत्र नेमकं कोण-कोण पितं हेसुद्धा मला पाहायचं आहे', असं ती ट्विट करत म्हणाली. 

'इट हॅपन्स ओन्ली इन इंडिया' असं म्हणत भारतातील अनेक चक्रावून टाकणाऱ्या गोष्टी यापूर्वी कित्येकदा सर्वांपुढे आल्या आहेत. पण, कोरोनाच्या प्रादुर्भावामध्येच हे असं काहीतरी पाहायला मिळणं म्हणजे कहरच म्हणावा. रिचाने तिची अशीच काहीशी प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर एका नेटकऱ्याने या पार्टीतील व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ पाहून तर ती भांबावलीच. किंबहुना हे असं काहीतरही होऊ शकतं यावर विश्वासच बसत नल्याची प्रतिक्रिया तिने दिली. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून रिचासमोर आलेल्या या गोमुत्र पार्टीव्यतिरिक्त आणखीही एक व्हिडिओ तिच्या निदर्शनास आला. ज्यामध्ये जगभरात जहशत पसरवणाऱ्या कोरोनासंदर्भातील भजन म्हटलं जात असताना पाहायला मिळत आहे. गोमुत्र पिण्याने कोरोनावर मात करता येते असं म्हणत गोमुत्र पार्टीचं आयोजन म्हणू नका किंवा मग कोरोनाचं भजन; भारतात या व्हायरसची दहशत असताना काही ठिकाणी मात्र असे भंडावून सोडेणारे प्रकारही पाहायला मिळत असल्याची बाब यानिमित्ताने समोर आली.