बॉलिवूड अभिनेत्रीचं बर्थ डे सेलिब्रेशन ड्रग्ससोबत; पोलिसांकडून अटक

बॉलिवूडमध्ये होतोय ड्रग्सचा सर्रास वापर 

Updated: Jun 15, 2021, 07:30 AM IST
बॉलिवूड अभिनेत्रीचं बर्थ डे सेलिब्रेशन ड्रग्ससोबत; पोलिसांकडून अटक title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्रीला ड्रग्ससोबत बर्थ डे सेलिब्रेशन करणं पडलं महागात. अभिनेत्रीने ड्रग्ससोबत पार्टी दिली होती. ही पार्टी ऐन रंगात येत असतानाच पोलिसांना याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावरच पोलिसांनी रात्री उशिरा हॉटेलवर छापा मारला. पोलिसांनी अभिनेत्रीसह तिच्या मित्र परिवाराला अटक केली आहे. नाइरा नेहल शाह अशी अभिनेत्रीची ओळख पटली आहे. 

सांताक्रुझ पोलीस ठाण्यात अभिनेत्री विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेत्री नेहल शाह मुंबईतील एका फाइव्ह स्टार रूग्णालयात वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्रीच्या पार्टीत ड्रग्सचा सहभाग होता. या पार्टी दरम्यान पोलिसांनी याची माहिती मिळाली. पोलिसांनी रात्रीच छापा मारला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री तीन वाजता या हॉटेलवर छापा मारण्यात आला. यावेळी बॉलिवूडमध्ये छोटी भूमिका साकारणारी अभिनेत्री आणि तिच्यासोबत ड्रग्सचं सेवन करणाऱ्यांना अटक करण्यात आलं. पोलिसांनी अभिनेत्रीवर एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. 

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूड आणि ड्रग्स यातील संबंध अनेकदा उघड झाले आहेत. बॉलिवूड कलाकारांचे ड्रग्स कनेक्शन गेल्या काळापासून समोर येत आहे.  काही महिन्यांपूर्वी दिलीप ताहील यांचा मुलगा ध्रुव ताहीलला मुंबई पोलिसांच्या एमसी नार्कोटिक्स सेलने अटक केली आहे. ध्रुवकडून नार्कोटिक्स सेलने 35 ग्राम एमडी (mephedrone) ड्रग्स सुद्धा जप्त केलं आहे. 

काही दिवसांपूर्वी मुंबईतून एनसीबीनं शादाब बटाटा या ड्रग्ज पेडलरला अटक केली होती. बॉलिवुडमधल्या अनेक सेलिब्रिटींना तो ड्रग्ज पुरवत असल्याचं समोर आलं होतं. शादाबच्या चौकशीतूनच अभिनेता एजाज खानचं नाव समोर आलं होतं. त्याला अखेर NCB नं ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.