डाएटला मारा गोळी; पिझ्झा समोर येताच मलायका कशी तुटून पडली पाहा

... हा व्हिडीओ पाहून तर तसं वाटत नाहीये....   

Updated: Dec 9, 2021, 04:58 PM IST
डाएटला मारा गोळी; पिझ्झा समोर येताच मलायका कशी तुटून पडली पाहा  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा ही तिच्या मादक सौंदर्यासाठी ओळखली जाते. मलायकाचा अंदाज आणि 48 व्या वर्षीही एखाद्या विशीतल्या मुलीला लाजवेल असाच आहे. एकाएकी मलायकाच्या सौंदर्याची चर्चा होण्याचं कारण ठरत आहे तिनं पोस्ट केलेला एक व्हिडीओ. 

मलायकाचा कमनीय बांधा आणि तिचा अंदाज पाहता ही सेलिब्रिटी तिच्या खाण्यापिण्याच्या सवयीबाबत बरीज सजग असल्याचं म्हटलं जात आहे. 

तिच्या सुट्ट्यांचा व्हिडीओ पाहताना मात्र कसलं डाएट आणि कसलं काय, अशीच प्रतिक्रीया तुम्हीही द्याल. 

कारण, मालदीवला प्रियकर अर्जुन कपूर याच्यासह सुट्टीसाठी गेलेल्या मलायकानं तिथे एकच धमाल केल्याचं पाहायला मिळालं. 

जिथं एकीकडे अर्जुन सायकलिंग करताना दिसत आहे. तर, दुसरीकडे मलायका समोर असणाऱ्या चवीष्ठ पिझ्झाचा एक तुकडा मोठ्या चवीनं खाताना दिसत आहे. 

बिकीनीमध्ये समुद्रकिनारी सुर्यप्रकाश अंगावर घेताना दिसत आहे. सा साऱ्यामध्ये मलायकाचं सौंदर्य चार चाँद लावून जात आहे. 

कामाच्या व्यग्र वेळापत्रकातून मलायका आणि तिचा प्रियकर, अभिनेता अर्जुन कपूर यांनी थेट मालदीव गाठलं. 

सुट्ट्यांदरम्यान त्यांनी काही निवांत क्षणांचा आनंद घेत आपल्या नात्यालाही बहरण्यासाठी तितकाच वेळ दिला.