Aryan Khan Bail : आर्यनला जामीन मिळताच, रात्री उशीरा 'मन्नत'वर कोण पोहोचलं?

आर्यन खान याची अखेर सुटका   

Updated: Oct 29, 2021, 11:20 AM IST
Aryan Khan Bail : आर्यनला जामीन मिळताच, रात्री उशीरा 'मन्नत'वर कोण पोहोचलं?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेता शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांनी मागच्या काही दिवसांमध्ये फार चढ-उतार पाहिले. जीवनातील सर्वाता आव्हानाचा काळ त्यांनी या दिवसांमध्ये पाहिला असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही, हीच अनेकांची प्रतिक्रिया.

शाहरुख आणि गौरीचा मुलगा आर्यन खान याची कारागृहातून अखेर सुटका झाली. 

गुरुवारीच त्याचा जामीन मंजूर करण्य़ात आला. हा निकाल जाहीर होताच सोशल मीडियावर कलाकार व्यक्त होऊ लागले. सर्वांनीच किंग खान आणि त्याच्या कुटुंबालासाठी सदिच्छा पाठवल्या. 

काही कलाकारांनी थेट शाहरुखचं घर गाठण्यास सुरुवात केली. यामध्ये अनेक मोठ्या नावांचा समावेस होता. 

मन्नतवर रात्री उशिरानं पोहोचणारेही काही चेहरे होते, ज्यांनी माध्यमांचं लक्ष वेधलं. 

काळ्या रंगाच्या रेंज रोव्हर गाडीतून 'मन्नत'वर पोहोचलेल्या या कलाकारांचं नाव होतं, मलायका अरोरा आणि अमृता अरोरा. 

बॉलिवूडमध्ये गौरी खान हिच्या काही खास मैत्रीणी आहेत. यामध्ये सीमा खान, माहीप कपूर यांचाही समावेश आहे. ज्यांनी इन्स्टाग्रामचा आधार घेत खान कुटुंबाला शुभेच्छा दिला. 

आर्यनची सुटका झाल्यामुळे जणू शाहरुखच्या घरी आनंदानं पुन्हा प्रवेश केला आहे, असं सध्या तिथंलं वातावरण पाहून लक्षात येत आहे.