रामायणात 'मंथरा' साकारणाऱ्या अभिनेत्रीच्या बिकीनी फोटोशूटमुळं धुमाकूळ; गिनीजनंही घेतली दखल

Bollywood News : हिंदी चित्रपट जगतामध्ये आजवर अनेक अभिनेत्रींनी नावलौकिक मिळवला. काळाच्या ओघात नवनवीन अभिनेत्रींना प्रसिद्धीझोतात येण्याची संधीही मिळालं. पण, काही नावं या गर्दीत हरवून गेली....   

सायली पाटील | Updated: Nov 29, 2023, 03:22 PM IST
रामायणात 'मंथरा' साकारणाऱ्या अभिनेत्रीच्या बिकीनी फोटोशूटमुळं धुमाकूळ; गिनीजनंही घेतली दखल  title=
Bollywood actress Lalita Pawar Real Name To Bikini Kissing Scene Name In Guinness World Record

Bollywood News : हिंदी कलाजगतामध्ये काही नावं इतकी प्रसिद्धीझोतात आली की 'बस नाम ही काफी है... ' ही ओळ त्या नावांसाठी पुरेपूर लागू झाली. पण, काही नावं मात्र जितक्या प्रचंड प्रमाणात प्रसिद्धीझोतात आली तशीच काळाच्या ओघात मागेही पडली. एक काळ गाजवणारी अशीच एक अभिनेत्री 'कजाख सासू' म्हणून रुपेरी पडद्यावर झळकली आणि तिनं मुख्य अभिनेत्रीच्या रुपात असणाऱ्या सौंदर्यवतींनाही तगडं आव्हान दिलं. 

प्रसिद्धी इतकी मिळाली की, या अभिनेत्रीचा चांगलाच दबदबा निर्माण झाला. मुळात या अभिनेत्रीनं अनेक चौकटी तोडत भूमिका निवडल्या आणि तितक्याच ताकदीनं निभावल्यासुद्धा. स्टंटबाजीपासून बिकीनी शूटपर्यंच सर्वच गोष्टींमुळं या अभिनेत्रीनं नजरा वळवल्या. 'रामायणा'त तिनं साकारलेली 'मंथरा' इतकी गाजली की, या भूमिकेत दुसऱ्या अभिनेत्रीचा विचारही करणं अनेकांनाच अशक्य झालं. या अभिनेत्रीचं नाव एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेल. हे नाव आहे, ललिता पवार यांचं. 

मुळच्या इंदूर येथील ललिता पवार यांचं खरं नाव होतं, अंबिका. 'पतितोद्वार' हा त्यांचा पहिला चित्रपट. पुढं 'हिम्मते मर्दां' या चित्रपटामध्ये त्यांनी अभिनयासोबतच गाणंही गायलं. तुमचा विश्वास बसणार नाही, पण ललिता पवार यांनी तब्बल 700 चित्रपटांमध्ये काम केलं. ज्यामुळं त्यांच्या या कारकिर्दीची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये घेण्यात आली. 

1942 मध्ये ललिता पवार 'जंग-ए-आजादी' या चित्रपटाचं चित्रीकरण करत होत्या. ज्यामध्ये अभिनेते भगवान दादा यांची महत्त्वाची भूमिका होती. चित्रपटातील एका दृश्यामध्ये त्यांना ललिता पवार यांच्या चपराक लगावायची होती. त्याचवेळी भगवान दादा यांनी ललिता पवार यांच्या अगदी जोराची चपराक लगावली, इतकी की त्या तिथंच कोसळल्या. यानंतर त्यांच्या कानातून रक्त वाहू लागलं. याचदरम्यान ललिता पवार यांच्यावर उपचार करत असणाऱ्या डॉक्टरनं त्यांना चुकीची औषधं दिली आणि याचमुळं त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. यातूनही त्या सावरल्या पण, त्यांच्या एका डोळ्याला झालेली इजा मात्र कायम राहिली. 

Happy Birthday: वो खूबसूरत अदाकारा जिसने शूटिंग के दौरान खो दी अपनी एक आंख, बेहद दर्दनाक हुई थी मौत

स्टंटबाजी आणि बिकीनी फोटोशूट 

गतकाळात अनेक गोष्टींसाठी बंधनं असताना ललिता पवार यांनी बऱ्याच बोल्ड चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. 'मस्ती खोर', 'माशूक' आणि 'भवानी तलवार' या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. ललिता पवार या हिंदी चित्रपट जगतातील पहिल्या बिकीनी गर्लही होत्या. त्या काळात त्यांनी काही चित्रपटांमध्ये बिकीनी सीन शूट केले होते. इतकंच नव्हे, तर 'पतिभक्ति' चित्रपटातील त्यांच्या किसिंग सीनमुळंही प्रचंड खळबळ माजली होती. अशा या अभिनेत्रीची तुम्हाला आवडलेली कलाकृती कोणती?