कतरिनाकडून मेकअप करून घेत अभिनेता म्हणाला...

त्याच्या प्रश्नांची उत्तरं देत...... 

Updated: Oct 22, 2019, 03:23 PM IST
कतरिनाकडून मेकअप करून घेत अभिनेता म्हणाला...  title=

मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफ हिच्या सौंदर्याने अनेकजण घायाळ होतात. फक्त चाहत्यांच्या वर्तुळातच नव्हे तर सेलिब्रिटींच्या वर्तुळातही कतरिनाच्या सौंदर्याची वाहवा होत असते. अशा या सौंदर्यवतीने नुकतच एका कार्यक्रमात बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्याला मेकअप केल्याचं पाहायला मिळालं. 

हा अभिनेता म्हणजे खुद्द रणवीर सिंग. पुरस्कार सोहळ्याचं रेड कार्पेट असो, एखादी पार्टी असो किंवा मग खास समारंभ. त्या ठिकाणी रणवीर येणार असेल तर, त्याची धमाल पाहायला मिळणार हा जणू अलिखित नियमच. 

'वोग'तर्फे आयोजित एका कार्यक्रमात रणवीरने अशीच धमाल केली. कतरिना कैफने याचा व्हिडिओच सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. कतरिना लिपस्टीक लावत असतानाच रणवीर तेथे येऊन तिला काही प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्याच्या प्रश्नांची उत्तरं देत आता 'मी तुला काही लिपस्टीक लावू शकत नाही. पण, त्याऐवजी मी तुला काजळ लावते', असं कतरिना म्हणाली. 

रणवीरही मोठ्या उत्साहात तिच्याकडून काजळ लावून घेतो. 'खिल्जी', 'बाजीराव' यांसारख्या व्यक्तीरेखा साकारताना आपण काजळाचा वापर केल्याचंही त्याने कतरिनाला सांगितलं. कतरिनाने काजळ लावल्यानंतर रणवीरने त्याच्याच शैलीत तिचे आभारही मानले. 

कतरिनाने पोस्ट केलेला हा व्हिडिओ ब्युटी प्रॉडक्ट्सची जाहिरात असल्याचं तिचा व्हिडिओ आणि त्यावरील कॅप्शन पाहून लक्षात येत आहे. शिवाय या जाहिरातीच्या निमित्ताने रणवीरचंही नवं रुप पाहायला मिळत आहे, असं म्हणायला हरकत नाही.