मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान हिनं कायमच तिच्या खासगी जीवनात महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. नात्यांबाबत असो किंवा मग करिअरबाबत असो. करीनानं कायमच प्रत्येक बाबतीत आपला वेगळेपणा सिद्ध केला आहे. तिचा हाच अंदाज या चित्रपटसृष्टीतही तितकाच प्रशंसनीय ठरत आहे. सध्याही बी टाऊनची ही बेबो अशाच कारणामुळं चर्चेत आहे. जिथं तिनं अग्नीला साक्ष ठेवत जे केलंय ते पाहून अनेकांच्याच नजरा वळत आहेत. (kareena kapoor)
नुकताच करीनाचा वाढदिवस पार पडला, यावेळी कुटुंबासह ती मालदिव येथे पोहोचली होती. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर करत करीनानं या खास क्षणांची एक झलकही सर्वांच्या भेटीला आणली. इथंच करीनानं धगधगत्य़ा अग्नीला साक्ष ठेवत एक गोष्ट केली.
अग्नीच्या साक्षीनं यंदाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं करीनानं स्वत:शीच एक वचन केलं. मी स्वत:मध्ये असणारी आग (उत्साह, कुतूहल आणि जगण्याची उमेद) अशीच कायम ठेवेन असं वचन तिनं दिलं.
करीनाचं हे कॅप्शन आणि तिनं पोस्ट केलेला फोटो हा सर्वांनाच इतरांसाठी जगण्यासोबत स्वत:साठीही जगण्याचा कानमंत्र देऊन गेला. धकाधकीच्या जीवनात अनेकदा आपण इतरांसाठी जगता जगता स्वत:ला कोणा एका कोपऱ्यामध्ये विसरुन जातो. पण, असं न करता आपणही तितकेच महत्त्वाचे आहोत याची जाणीव असणं कधीही गरजेचं आहे, हेच करीनानं सांगितलं आहे.