जॅकलिनच्या बोल्ड अदा पाहून चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला

Far Far Away.... 

Updated: Nov 25, 2020, 03:42 PM IST
जॅकलिनच्या बोल्ड अदा पाहून चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला   title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : सोशल मीडियावर कायमच चर्चेत असणारी आणि नवनवीन रुपांमध्ये सर्वांसमोर येणारी अभिनेत्री जॅकिन फर्नांडिस jacqueline fernandez  पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधत आहे. यावेी निमित्त ठरत आहे ते म्हणजे तिची सोशल मीडिया पोस्ट. 

Far Far Away.... असं कॅप्शन निहित तिनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. मोनोक्रोम फ्रेममधील जॅकलिनच्या घायाळ करणाऱ्या अदा पाहताक्षणीच भुरळ घालत आहेत. मोकळे आणि काहीसे विस्कटलेले केस, एकिकडे रोखलेली तिची नजर आणि चेहऱ्यावरील भाव पाहता जॅकलिनचा हा बोल्ड अंदाज सध्या चर्चेचाच विषय ठरत आहे. फार कमी मेकअप असल्यामुळं यात तिचं नैसर्गिक सौंदर्य आणखी खुलून आलं आहे. 

जॅकलिनच्या या फोटोला आतापर्यंत लाखोच्या संख्येनं लाईक्स आले आहेत. शिवाय त्यावर अनेक कमेंट्सही आल्या आहेत. 

 

सोशल मीडियावर आपल्या सौंदर्याच्या बळावर प्रेक्षकांची मनं जिंकणारी ही अभिनेत्री 'भूत पोलीस' या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटातून ती यामी गौतम, सैफ अली खान, अर्जुन कपूर यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या काही भागाचं चित्रीकरण हिमाचल प्रदेशातील डलहौसी आणि धरमशाला या भागांमध्ये करण्यात आलं आहे. यानंतर ती रणवीर सिंग याच्यासोबतच्या 'सर्कस' या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु करणार आहे. मागोमागच सलमानसोबतचा 'किक 2' हा चित्रपटही रांगेत आहेच. त्यामुळं तिचं येत्या काही दिवसांतील वेळापत्रक व्यग्रच आहे, असं म्हणायला हरकत नाही.