बालपणीचे फोटो शेअर करणाऱ्या दीपिकाकडे 'गुड न्यूज'?

दीपिकावर प्रश्नांचा भडिमार 

Updated: Nov 4, 2019, 01:34 PM IST
बालपणीचे फोटो शेअर करणाऱ्या दीपिकाकडे 'गुड न्यूज'?  title=
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोण ही रुपेरी पडद्यावर सक्रीय असण्यासोबतच ती खासगी आयुष्यालाही तितकंच प्राधान्य देताना दिसते. साधारण वर्षभरापूर्वी अभिनेता रणवीर सिंग याच्यासोबत विवाहबंधनात अडकलेल्या दीपिकाने नुकतेच इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. 

दीपिकाने सोशल मीडियावर फोटो शेअर करणं ही नवी बाब नाही, पण यावेळी तिने आपले अतिशय जुने फोटो शेअर केले आहेत. जन्मल्यानंतर अवघ्या काही महिन्यांनंतरचे दीपिकाचे हे फोटो चाहत्यांच्या मनाचा ठाव घेत आहेत. यामधून तिची निरागसता पाहता अनेक चाहत्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला आहे. 

'दिवाळीनंतरचे दिवस असे साजरा केले जात आहेत....'असं तिने या फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिलं. दीपिकाचा पती, अभिनेता रणवीर सिंग यानेही तिच्या फोटोंवर कमेंट केली. एकिकडे रणवीर दीपिकाच्या फोटोंवर कमेंट करत असतानाच दुसरीकडे चाहत्यांच्या मनात मात्र भलल्याच प्रश्नांनी घर केलं. दीपिकाने एकाएकी शेअर केलेले तिचे बालपणीचे फोटो आणि त्यासोबत लिहिलेलं कॅप्शन पाहता तिच्याकडे गोड बातमी तर नाही ना? असा प्रश्न अनेक चाहत्यांनी उपस्थित केला. 

 
 
 
 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

 
 
 
 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

काही नेटकऱ्यांनी तर, या प्रश्नांचा भडिमारच तिच्यावर केला. यावर दीपिकाने काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. पण, तिने हे फोटो शेअर करण्याचं कारणही तसं अस्पष्टच. त्यामुळे चर्चांनी डोकं वर काढण्याला अधिक वाव मिळत आहे. 

बी- टाऊनची ही सौंदर्यवती येत्या काळात '`८३' या चित्रपटातून दीपिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कबीर खानच्या दिग्दर्शनात साकारणाऱ्या या चित्रपटाच्या निमित्ताने ती खऱ्या आयुष्याप्रमाणेत आता रुपेरी पडद्यावरही रणवीरच्या पत्नीच्या रुपात दिसेल. लग्नबंधनात अडकल्यानंतर हा दीपिका आणि रणवीरचा एकत्र असा पहिला चित्रपट असेल.