असा उभा राहतोय Deepika- Ranveer चा अलिबागमधील आशियाना, पाहा व्हायरल फोटो

ही जोडी सध्या त्यांचा नवा आशियाना उभा करण्याच्या तयारीत लागली आहे

Updated: Sep 30, 2021, 09:25 AM IST
असा उभा राहतोय Deepika- Ranveer चा अलिबागमधील आशियाना, पाहा व्हायरल फोटो  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

अलिबाग : हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीची जोडी म्हणून नावाजल्या जाणाऱ्या अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांनी कायमच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. दीपिका आणि रणवीर या दोघांनीही चित्रपटांच्या बाबतीत असो, किंवा मग सहजीवनाचे नवे गोल्स देत काही मापदंड प्रस्थापित करण्याच्या बाबतीत असो, प्रेक्षकांना कधीच निराश केलं नाही. अशी ही जोडी सध्या त्यांचा नवा आशियाना उभा करण्याच्या तयारीत लागली आहे. (Bollywood actress deepika padukone ranveer singh new home in alibaug)

दीपिका आणि रणवीरनं अलिबागमध्ये केलेल्या एका व्यवहाराच्या नोंदणीसाठी ते दोघंही जेव्हा तहसीलदार कार्यालयात पोहोचले तेव्हा याबाबतची माहिती समोर आली. सूत्रांच्या माहितीनुसार मागच्याच महिन्यात दीपिकानं बंगळुरू येथेही एक प्रॉपर्टी खरेदी केली होती. हा बराच महागातला व्यवहार ठरला होता. जिथं आता काम सुरु करण्यात आलं आहे. 

आता म्हणे अलिबागमध्येही त्यांनी अशीच एक प्रॉपर्टी खरेदी केली असून, तिथं काम सुरु करण्यात आलं आहे. डिझायनर विनीता चैतन्य हिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन यासंदर्भातील एक फोटोही शेअर केला आहे. विनीतानं दीपिका आणि रणवीरसोबतचा आपल्या कारमधील एक फोटो शेअर करत, माझ्या कारमध्ये ही कोण लोकं आहेत असा प्रश्न केला. या फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये तिनं वेलकम टू अलिबाग असा हॅशटॅगही जोडला आहे. त्यामुळं आता दीपिकाच्या अलिबागमधील आशियानाला एक नवं रुप मिळत असल्याची बाब समोर आली आहे. 

दीपिका आणि विनीता फार चांगल्या मैत्रिणी आहेत. दीपिका- रणवीरच्या विविहसोहळ्यावेळीही विनीता इटलीतील लेक कोमो येथे उपस्थित होती. त्यामुळं आता आपल्या खास मैत्रिणीच्या या नव्या घरासाठी विनीता नेमकी काय जादू करते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.