मुंबई : जिथं बॉलिवूडकरांच्या राहणीमानाचा चाहत्यांना हेवा वाटतो तिथेच अशी जीवनशैली मिळवण्यासाठी ही मंडळीसुद्धा प्रयत्न करताना दिसतात. कलाकारांच्या वाट्याला येणारं यश, त्यांच्यामध्ये होणारी प्रगती यामध्येच एक अविभाज्य घटक असतो तो म्हणजे त्यांच्याकडे असणाऱ्या आलिशान आणि महागड्या कार. (Bollywood Actress )
एका वळणावर पोहोचल्यानंतर साध्यासुध्या कारनं न फिरता ही मंडळी थक्क करतील अशाच किमतीच्या कारना पसंती देतात. त्यांची कारची निवडही आपल्याला हादरा देणारी असते बरं.
नुकतंच एका बॉलिवूड अभिनेत्रीनं अशीच एक कार खरेदी केली आहे. तिनं खरेदी केलेली ही कार लाखोंच्या दरात आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 79.99 लाख रुपये इतकी आहे.
कारच्या टॉप व्हॅरिएंटसाठी तब्बल 88.33 लाख रुपये इतकी किंमत मोजावी लागते. ही कार आहे, ऑडी Q7 SUV. आतापर्यंत बऱ्याच बॉलिवूड सेलिब्रिटींनी या कारला पसंती दिली आहे. ज्यामध्ये आता अभिनेत्री अदिती राव हैदरी हिचं नावही जोडलं गेलं आहे. (Actress aditi rao hydari buys a brand new Audi Q7 SUV car features )
भारतात BS6 इंजिन नियम लागू झाल्यानंतर या कंपनीच्या एसयुव्हींची विक्री बंद करण्यात आली होती. पण, आता मात्र यामध्ये काही बदल करत ऑडी Q7 ला BS6 इंजिन देण्यात आलं आहे. (new Audi Q7 SUV car)
कारचं नवं व्हॅरिएंट प्रिमीयम प्लस आणि टेक्नोलॉजी अशा प्रकारांमध्ये सादर करण्यात आलं आहे. भारतात याची आयातच केली जात असून औरंगाबादस्थित स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया प्लांटमध्ये त्याची निर्मीती करण्यात येते.
एचडी मेट्रिक्स डिजाइन असणाऱ्या हेडलाइट्स, ऑडी लेजर लाइट, मागील भागात सपाट टेललाइट्सना जोडणारी एक क्रोमची पट्टी , कारसोबत 19-इंच अलॉय व्हील्स ऑल-सीजन टायर्सही देण्यात आले आहेत.
2022 ऑडी Q7 ला 3.0-लीटर टीएफएसआई V6 इंजिन देण्यात आलं आहे. ज्यामध्ये 335 बीएचपी पॉवर आणि 500 एनएम पीक टॉर्क निर्माण होतो. फक्त 5.7 सेकंदांमध्ये ही कार 0-100 किमी/ प्रतितास इतका सरासरी वेग पकडते.
दमदार फिचर्स, अद्ययावर तंत्रज्ञान आणि तितकंच देखणं रुप अशा फिचर्ससह ही कार अदिती राव हैदरी हिच्या दारी आली आहे. ऑडीकडूनही तिच्या जीवनातील या नव्या टप्प्यासाठी तिला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
अदितीनं वयाच्या 35 व्या वर्षी ही कार खरेदी केली आहे. अदितीपेक्षा वयानं लहान अभिनेत्रींनीही अशाच काही महागड्या कार खरेदी केल्या आहेत हे पाहता तिला उशीर झाला खरा... पण तिनं दमदार कारच खरेदी केली असं म्हणायला हरकत नाही.