सुशांतच्या आत्महत्येच्या तपासाला नवं वळण; ट्विटर अकाऊंटनं वेधलं पोलिसांचं लक्ष

पोलिसांनी आता पुढील पाऊल उचलत....   

Updated: Jun 30, 2020, 10:32 AM IST
सुशांतच्या आत्महत्येच्या तपासाला नवं वळण; ट्विटर अकाऊंटनं वेधलं पोलिसांचं लक्ष title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : कलेच्या बळावर हिंदी चित्रपट विश्वात आपली वेगळी ओळख प्रस्थापित करणाऱ्या अभिनेता sushant singh rajput सुशांत सिंह राजपूत यानं काही दिवसांपूर्वीच मुंबईतील त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली. गळफास लावून आयुष्य संपवणाऱ्या सुशांतचं जाणं अनेकांच्याच मनाला चटका लावून गेलं. यातच त्याच्या निधनानं अनेक प्रश्नांनी डोकंही वर काढलं. 

सुशांत गेल्या काही महिन्यांपासून नैराश्याचा सामना करत होता. असं असतानाच घराणेशाहीमुळं त्याच्या कारकिर्दीत एक अनपेक्षित टप्पा आल्याचंही बोललं गेलं. या साऱ्यामध्येच मुंबई पोलिसांनी सुशांतच्या आत्महत्येचं खरं कारण शोधण्यासाठीचा तपासही सुरु केला. ज्या धर्तीवर आतापर्यंत जवळपास २७ जणांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. 

तपासाच्या याच प्रक्रियेमध्ये आता मुंबई पोलिसांकडून सुशांतच्या ट्विटर अकाऊंटचा तपशील मागवण्यासाठी ट्विटर इंडियाला एक पत्र लिहिण्यात आलं आहे. त्याच्या अकाऊंटवरुन कोणतं ट्विट डिलीट करण्यात आलं आहे का आणि केलं असल्याच असं का करण्यात आलं, याच्या मुळाची पोलिसांना पोहोचायचं आहे. 

 

@SSR असं सुशांतचं ट्विट हँडल असून, या अकाऊंटवरुन डिसेंबर महिन्यात शेवटचं ट्विट करण्यात आल्याचं दिसत आहे. सुशांतनं केलेलं हे ट्विट त्याच्या ट्विटरवरील एकंदर पोस्ट या साऱ्याचा आढावा घेत आता या प्रकरणीचा तपास पुढील टप्प्यात पोहोचणार आहे.