SSR Case Exclusive : सुशांतच्या बँक खात्याचा 'तो' तपशील तपासाला वेगळं वळण देणार

नवी माहिती समोर आल्यामुळं आता...

Updated: Sep 18, 2020, 10:15 AM IST
SSR Case Exclusive : सुशांतच्या बँक खात्याचा 'तो' तपशील तपासाला वेगळं वळण देणार  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत sushant singh rajput आत्महत्या प्रकरणी दर दिवशी नवी आणि तितकीच धक्कादायक माहिती समोर आल्यामुळं आता या प्रकरणाला आणखी एक नवं वळण मिळण्याची चिन्हं आहेत. मुख्य म्हणजे या माहितीमुळं आता तपास यंत्रणा कोणत्या निर्णयावर पोहोचते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण, सध्या सुशांतच्या बँक खात्याचा तपशील समोर आला असून, एकूण खर्च उघड झाला आहे. 
'छिछोरे'च्या पार्टीसाठी ४० हजारांचा खर्च 

बँक खात्याच्या तपशीलातून समोर आलेल्या माहितीनुसार २८ मार्च २०१९ ला सुशांतच्या पावना फार्म हाऊसवर 'छिछोरे' या चित्रपटाची पार्टी झाली होती. ज्यासाठी सुशांतनं ४० हजार रुपये खर्च केल्याचं कळत आहे. 

No description available.

No description available.

No description available.

सारामागोमाग आणखी एका अभिनेत्रीचं नाव समोर येऊ शकतं 

एकिकडे सीबीआयच्या हाती महत्त्वाची माहिती लागली असतानाच दुसरीकडे एनसीबीच्या हातीसुद्धा काही धागेदोरे लागत आहेत. ज्यामध्ये या पार्टीमध्ये ड्रग्जचा वापर केल्याचं कळत आहे. एका ब़ॉलिवूड अभिनेत्रीनं या पार्टीमध्ये ड्रग्जचं सेवन केलं होतं. रिया चक्रवर्ती आणि दीपेश शाह यांनी एनसीबीला चौकशीदरम्यान दिलेल्या माहितीमध्ये या अभिनेत्रीच्या नावाचा खुलासा केला आहे. त्यामुळं येत्या काळात या अभिनेत्रीचंही नाव समोर येण्याची चिन्हं आहेत. परिणामी सारा अली खान हिच्यामागोमार ही आणखी एक अभिनेत्री या प्रकरणात अडचणीत येऊ शकते असं म्हटलं जात आहे. 

 

चित्रपटविश्वातील करिअरने सुशांतनं कमवले जवळपास ६० कोटी रुपये 

सुशांतनं चित्रपटविश्वातील त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत जवळपास ६० कोटी रुपयांची कमाई केली होती. त्याच्या या बँक खात्यावर बहिण नॉमिनी आहे. सुशांतनं अंकिता आणि स्वत:च्या नावे जवळपास ३ कोटींचा प्लॉट खरेदी केला होता. मृत्यूसमयी त्याच्या खात्यावर अडीच ते तीन कोटी रुपये शिल्लक होते.