घराणेशाहीच्या मुद्द्यावर मत मांडताना राम गोपाल वर्माकडून उद्धव ठाकरेंचं उदाहरण

अभिनेता sushant singh rajput सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड वर्तुळात घराणेशाही अर्थात नेपोटीझमचा वाद चांगलाच पेटला. 

Updated: Jun 18, 2020, 04:07 PM IST
घराणेशाहीच्या मुद्द्यावर मत मांडताना राम गोपाल वर्माकडून उद्धव ठाकरेंचं उदाहरण title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई: अभिनेता sushant singh rajput सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड वर्तुळात घराणेशाही अर्थात नेपोटीझमचा वाद चांगलाच पेटला. ज्यामध्ये काही बड्या नावांवर बी- टाऊनमधील निवडक कलाकारांनी निशाणा साधला. प्रस्थापितांकडून मिळालेल्या वागणुकीमुळं आणि कारकिर्दीत अपेक्षित संधीच हिरावल्या गेल्यामुळं सुशांतनं नैराश्याच्या आहारी जात हे पाऊल उचलल्याचे गंभीर आरोपही करण्यात आले. 

सोशल मीडियावरही या वादाचे पडसाद उमटले. जिथं दोन गट पडल्याचं पाहायला मिळालं. बॉलिवूड निर्माता- दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यानंही या वादात त्याचं मत मांडत करण जोहरची बाजू घेतली. यावेळी त्यानं काही उदाहरणंही दिली. ज्यामध्ये त्यानं राजकीय वर्तुळातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याही नावाचा उल्लेख केला. 

राजकारणापासून व्यवसायापर्यंत घराणेशाही 

सलग काही ट्विट करत राम गोपाल वर्मानं राजकारणापासून ते अगदी व्यवसायापर्यंत सर्वच ठिकाणी घराणेशाही असल्याचं स्पष्ट केलं. घराणेशाही कुठे नाही आहे. जे झालं त्यासाठी करण जोहरला दोषी ठरवणं बंद करा. सुशांतची निवड करायची नव्हती तरीही करणला कोणासोबत काम करायचं आहे हा त्याचा सर्वस्वी निर्णय होता असं वर्मानं स्पष्ट केलं. 

१२ वर्षांच्या कारकिर्दीनंतर सुशांतला कलाविश्वात वेगळेपणाच्या भावनेने आत्महत्येचं पाऊल उचलावं लागत असेल तर, दररोज अशा १०० कलाकारांनी आत्महत्या करावी जे त्याच्या आसपासही नाहीत. करण जोहर घराणेशाहीमुळं नव्हे तर त्याचे चित्रपट प्रेक्षक पाहत असल्यामुळं या चित्रपट वर्तुळात आहे हे त्यानं अधोरेखित केलं. 

'जसं मुलायम, उद्धव ठाकरे यांच्यासारखे राजकीय नेते त्यांच्या मुलांना प्राधान्य देतात, ज्याप्रमाणं धीरुभाई अंबानी यांनी मुकेश, अनिल यांना व्यवायाची सूत्र दिली. ज्याप्रमाणं या कुटुंबांनी त्यांच्या कुटुंबीयांना प्रथम प्राधान्य दिलं त्याचप्रमाणं चित्रपट वर्तुळातही केलं जातं. घराणेशाही कुठे नाही सांगा?', असा प्रश्न राम गोपाल वर्मानं उपस्थित केला. 

सुशांतच्या निधनानंतर बहिणीच मन हेलावून टाकणारी पोस्ट व्हायरल

 

घराणेशाहीशिवाय डोलारा ढासळेल 

घराणेशाहीकडे नकारात्मकतेनं पाहणं म्हणजे एक थट्टा आहे, असं म्हणत समाज हा कुटुंबावर प्रेम करण्याच्या तत्त्वावरच टीकून असल्याचा मुद्दा त्यानं उपस्थित केला. घराणेशाहीशिवाय समाजाचा हा डोलारात ढासळेल कारण, या रचनेचा हा पायाच आहे असं म्हणयला हरकत नाही, या शब्दांत त्यानं आपली ठाम भूमिका मांडली.