सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत अंकिता लोखंडे भावूक, खास फोटो केला शेअर

सुशांत सिंहच्या मृत्यूला चार वर्षे उलटल्यानंतर अभिनेत्री अंकिता लोखंडेने एक पोस्ट शेअर केली आहे. 

Updated: Jun 14, 2024, 08:31 PM IST
सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत अंकिता लोखंडे भावूक, खास फोटो केला शेअर title=

Sushant Singh Rajput Death Anniversary : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा मृत्यूला चार वर्षांहून अधिक काळ उलटला आहे. मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या त्याच्या राहत्या घरात सुशांतचा मृतदेह आढळून आला होता. सुशांत सिंहच्या मृत्यूनंतर त्याचे जुने फोटो आणि व्हिडीओ सातत्याने व्हायरल होत असतात. तसेच अनेक चाहतेही त्याची आठवण काढताना दिसतात. आता सुशांत सिंहच्या मृत्यूला चार वर्षे उलटल्यानंतर अभिनेत्री अंकिता लोखंडेने एक पोस्ट शेअर केली आहे. 

अंकिता लोखंडेने इन्स्टाग्रामवर शेअर केली स्टोरी

अभिनेत्री अंकिता लोखंडे इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असते. अंकिता लोखंडेने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यात तिने एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत सुशांत हा टीशर्ट आणि शॉर्ट्स परिधान करत असल्याचे दिसत आहे. यावेळी सुशांत हा पाळीव श्वानासोबत उभा असल्याचे दिसत आहे. या फोटोला तिने कोणतेही कॅप्शन दिलेले नाही. 

अंकिताने शेअर केलेल्या या फोटोत दिसणाऱ्या पाळीव कुत्र्याचे नाव स्कॉच असे आहे. हा कुत्रा सुशांतने अंकिताला भेट म्हणून दिला होता. त्या दोघांचाही त्याच्यावर प्रचंड जीव होता. पण फेब्रुवारी 2024 मध्ये स्कॉचचेही निधन झाले होते.

Ankita Lokhande post

सात वर्षांनी केला ब्रेकअप

सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल होते. त्या दोघांनी पवित्र रिश्ता या मालिकेत काम केले होते. या कार्यक्रमामुळे त्यांची एकमेकांशी मैत्री झाली आणि नंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. पण सुशांतने बॉलिवूडमध्ये एंट्री केल्यानंतर त्या दोघांमध्ये दुरावा आला. सलग सात वर्षे डेट केल्यानंतर त्यांचा ब्रेकअप झाला. 

घरात आत्महत्या केलेल्या अवस्थेत आढळलेला मृतदेह

दरम्यान दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत १४ जून २०२० रोजी वांद्रे येथील त्याच्या घरात आत्महत्या केलेल्या अवस्थेत आढळला होता. अभिनेत्याच्या अचानक जाण्याने खळबळ उडाली होती. मुंबई पोलीस, ईडी, सीबीआय आणि एनसीबी या सर्व तपास यंत्रणांनी या प्रकरणाची चौकशी केली होती. चौकशीअंती सुशांतची हत्या नाही, तर आत्महत्याच होती, असा निर्णय अधिकाऱ्यांनी दिला होता.