प्रेयसीसोबत सहलीहून परतताना सिद्धार्थ मल्होत्रा Irrited; एअरपोर्टवर इतका भाव खाल्ला की... Video Viral

त्यांचं प्रेमाचं हे नातं बहुविध कारणांनी जगासमोर येत आहे.   

Updated: Aug 2, 2022, 12:09 PM IST
प्रेयसीसोबत सहलीहून परतताना सिद्धार्थ मल्होत्रा Irrited; एअरपोर्टवर इतका भाव खाल्ला की... Video Viral  title=
bollywood actor Sidharth Malhotra gets angry Kiara Advani calms him down video viral

मुंबई : अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री किआरा आडवाणी ही जोडी सध्या बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटी जोड्यांपैकी एक ठरत आहे. गेल्या काही काळापासून सिड आणि किआरा रिलेशनशिपमध्ये असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. या दोघांनी अद्यापही त्यांच्या नात्याची कबुली दिली नसली तरीही, प्रेमाचं हे नातं बहुविध कारणांनी जगासमोर येत आहे. (bollywood actor Sidharth Malhotra gets angry Kiara Advani calms him down video viral)

आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत असं म्हणत आपलं नातं सातत्यानं लपवणारी ही जोडी हल्लीच किआराच्या वाढदिवसानिमित्त दुबईला पोहोचली होती. सेलिब्रेशननंतर ते दोघंही एकत्रच मुंबईत परतले. 

सोमवारी सिद्धार्थ आणि किआरा मुंबईत परतले. यावेळी दोघांनीही काळ्या रंगांच्या आऊटफिटमध्ये ट्विनिंग केल्याचंही पाहायला मिळालं. सिड आणि किआराला एकत्र पाहून तिथं असणाऱ्या छायाचित्रकारांनीही त्यांचे फोटो काढण्याची लगबग केली. 

काहीजण पुढेही आले. पण, सिद्धार्थ त्यावेळी काहीसा विचित्र वागला आणि तिथं असणाऱ्यांनाही या अनपेक्षित प्रसंगानं धक्काच बसला. छायाचित्रकारांनी लगेचच त्या दोघांचे फोटो टीपण्यास सुरुवात केली असता सिद्धार्थनं Irrited होत इशाऱ्यानं आणि नजरेनं त्यांना दूर होण्यास सांगितलं. 

सिद्धार्थ काहीसा संतापला असल्याचं पाहत किआरानं लगेचच त्याला शांत राहण्याचा इशारा केला आणि ही जोडी तिथून निघून पुढे गेली. ते दोघंही पुढच्या प्रवासाला निघाले, पण अभिनेत्याचं हे वागणं मात्र कार्यक्रमात कैद झालं. ज्यावर काहींनी नाराजीही व्यक्त केली. सिद्धार्थचं हे वागणं पाहून काहीजण म्हणाले, 'हे वागणं बरं न्हवं...'