दोन वर्षांपूर्वी शाहरुखच्या आयुष्यात 'तिची' एन्ट्री; आज मोठी माहिती समोर

गेल्या काही काळापासून शाहरुख कोणत्याही ब्लॉकबस्टर चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला नाही. पण... 

Updated: Apr 5, 2022, 05:12 PM IST
दोन वर्षांपूर्वी शाहरुखच्या आयुष्यात 'तिची' एन्ट्री; आज मोठी माहिती समोर  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेता शाहरुख खान याच्या चित्रपटांप्रमाणेच त्याच्या खासगी आयुष्याचीही बरीच चर्चा झाली. गेल्या काही काळापासून शाहरुख कोणत्याही ब्लॉकबस्टर चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला नाही. पण, खासगी आयुष्यामुळं मात्र तो सातत्यानं प्रकाशझोतात राहिला. (shah rukh khan)

दोन वर्षांपूर्वी बी- टाऊनच्या या किंग खानच्या आयुष्यात अशीच एक घटना घडली ज्यासंबंधीची मोठी माहिती आता समोर आली आहे. 

तुम्ही आता जर कोणत्या चुकीच्या मार्गानं विचार करत असाल तर आताच थांबा. शाहरुखच्या आयुष्यात 2 वर्षांपूर्वी आलेली 'ती' कोण, ते आधी पाहा तरी.... 

गोपिका असं तिचं नाव. आता ही गोपिका कोण? तर, दोन वर्षांपूर्वी शाहरुख खान याच्या नावे शिष्यवृत्ती मिळालेल्या गोपिका कोट्टनथरायिल हिला आता त्याचा फायदा झाला. ज्यानंतर आता ती रिसर्चसाठी थेट ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचली. 

दोन वर्षांपूर्वी गोपिकाला शाहरुखच्याच हस्ते 1.5 कोटी रुपयांचा शिष्यवृत्ती पुरस्कार देण्यात आला होता. यानंतर काही दिवसांनीच तिला मेलबर्न येथील ला ट्रोब विद्यापीठात मधमाशांच्या संशोधनासाठी जायचं होतं. पण, तिला यासाठी 2 वर्षांची प्रतीक्षा करावी लागली. 

ती आता संशोधनासाठी त्या विद्यापीठात पोहोचली आहे. येत्या काळात ती लवकरच अॅग्रीकल्चर बायोसॉल्यूशन्स लॅबोरेटरीमध्ये प्रोफेसर ट्रेविस बेडडोच्या रिसर्च टीमसोबत काम करणार आहे. 

कशी मिळाली शिष्यवृत्ती ? 
2019 मध्ये शाहरुख खान ला ट्रोब विद्यापीठातून पीएचडी शिष्यवृत्तीची घोषणा केली. त्यावेळी किंग खानला समाजिक कामांसाठी डॉक्टर ऑफ लेटर ही मानद पदवी देण्यात आली. 

त्यावेळी भारतातील महिला संशोधकांना या क्षेत्रात संशोधनासाठी मोठी संधी देण्याचा आपला हेतू असल्याचं या विद्यापीठाकडून सांगण्यात आलं. 

याच शिष्यवृत्तीसाठी गोपिकाची 800 विद्यार्थ्यांमधून निवड झाली. ती एक बायोलजिक शास्त्रज्ञ असून, ती मुळची केरळची आहे. कोरोना काळामुळं तिच्या संशोधनाला 2 वर्षे ताटकळत रहावं लागलं. ज्यानंतर आता तिला या संशोधनासाठीची वाट मोकळी मिळाली आहे.