Katrina kaif Vicky kaushal : लग्नानंतर कतरिनाला गंभीर दुखापत; कुठे होता विकी कौशल?

तिचे व्हायरल होणारे फोटो पाहून विकी यावेळी कुठे होता, असाही प्रश्न काही चाहत्यांनी विचारला. 

Updated: Feb 21, 2022, 05:40 PM IST
Katrina kaif Vicky kaushal : लग्नानंतर कतरिनाला गंभीर दुखापत; कुठे होता विकी कौशल?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेता विकी कौशल याच्याशी लग्नगाठ बांधल्यानंतर कतरिना कैफ हिच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद सर्वांची मनं जिंकून गेला. कामात व्यग्र असतानाही ही जोडी एकमेकांसाठी कायमच वेळ काढताना दिसली. पण, आता म्हणे कतरिना जखमी झाली आहे. (Katrina Kaif)

आता कतरिनासोबत हे नेमकं काय आणि कसं घडलं हेच प्रश्न आता चाहते विचारू लागले आहेत. 

तिचे व्हायरल होणारे फोटो पाहून विकी यावेळी कुठे होता, असाही प्रश्न काही चाहत्यांनी विचारला. 

तर, कतरिनाची ही जखम आणि तिची ही दुखापत पाहून तुम्हालाही चिंता वाटत असेल, तर तसं होऊ देऊ नका. कारण, हे सर्व एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान झाल्याचं लक्षात येत आहे. 

सहाजिकच जिथे कतरिना चित्रीकरण करत आहे, तिथे तर विकी हजर नाही. 

Tiger 3 या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान एका सीनची गरज म्हणून त्यांना जखमी असल्याचा, दुखापत झाल्याचा मेकअप करण्यात आला होता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Salmanics_27 (@salmanics_27)

याचदरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल झाले. चित्रपटातील या सीनसाठी कतरिना कॉम्बॅट वेस्ट आणि जिन्स अशा लूकमध्ये दिसली. तर, सलमान टीशर्ट आणि ट्राऊजर अशा लूकमध्ये होता. 

चित्रीकरणादरम्यानचे एकंदर फोटो आणि व्हिडीओ पाहता, साहसी दृश्य आवडणाऱ्यांसाठी त्यांचा हा चित्रपट पर्वणी ठरणार असं म्हणायला हरकत नाही.