Finally....! पाहा ज्याची सर्वांना प्रतीक्षा होती, ती घोषणा Salman नं केलीच

चाहत्यांना ज्याची प्रतीक्षा होती तेच सरप्राईज दिलं आहे.   

Updated: Jan 21, 2022, 02:55 PM IST
Finally....! पाहा ज्याची सर्वांना प्रतीक्षा होती, ती घोषणा Salman नं केलीच title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : जगात कुठे काय चाललंय यापेक्षा बॉलिवूडच्या 'दबंग' सलमान खान (Salman Khan) याच्या आयुष्यात नेमकं काय चाललंय याचीच त्याच्या चाहत्यांना जास्त उत्सुकता लागलेली असते. बरं, सलमानही कायमच चाहत्यांशी असणारं आपलं नातं जपताना दिसला. आता म्हणे त्यानं चाहत्यांना ज्याची प्रतीक्षा होती तेच सरप्राईज दिलं आहे. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून असंख्य चाहत्यांच्या चेहऱ्यावर सलमानच्या या एका निर्णयानं आनंद पाहायला मिळत आहे. 

तुम्हाला काही अंदाज लावता येतोय का, की सलमाननं नेमकं काय केलंय? 

हा लग्न वगैरे करतोय की काय, कोण आहे ती... कधी करतोय सलमान लग्न... असे असंख्य प्रश्न आता तुमच्या मनात आले असतील. तर तरा श्वास घ्या. 

सलमाननं डोक्यावर गमछा बांधून फोटो शेअक करत एक बातमी दिली खरी. पण, ती त्याच्या लग्नाची नाही. अर्थात ती कमी आनंद देणारीही नाही. 

कारण, मी सगळं ऐकतोय... आज एक पोस्टर उद्या एक टीझर... असं म्हणत त्यानं कसलासा इशारा दिला आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार टी सीरिज आणि सलमान खान फिल्म्स या निर्मितीसंस्थेअंतर्गत साकारल्या जाणाऱ्या एका व्हिडीओमध्ये तो झळकणार आहे. 

सलमानची कथित प्रेयसी लुलिया वंतूर हिचा आवाज या गाण्याला असेल. तिला साथ मिळणार आहे गुरू रंधावा याची. 

चाहत्यांनी हा अंदाज बांधलाय की सलमान याच गाण्याच्या प्रमोशनसाठी इतकी मेहनत घेतोय, ज्यामुळं आता हा व्हिडीओ पाहण्याची प्रतीक्षा काही होईना अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत