पाहा, सलमानच्या मागोमागच 'ती' कारमधून उतरली आणि अशी झाली त्याची अवस्था...

सलमान ज्या कारनं आला, त्याच कारनं एक खास व्यक्तीही आली. 

Updated: Oct 26, 2021, 11:54 AM IST
पाहा, सलमानच्या मागोमागच 'ती' कारमधून उतरली आणि अशी झाली त्याची अवस्था...  title=
व्हिडीओ स्क्रीनग्रॅब

मुंबई : अभिनेता सलमान खान, हा चर्चेत येण्यास अगदी लहानसं कारणंही पुरेसं आहे. त्यातच बॉलिवूडचा हा दबंग अभिनेता कोणा रुपवान तरुणीसोबत दिसला, की चर्चा तर होणारच.... 

अशाच चर्चा सध्या सुरु झाल्या आहेत आणि त्याला कारणही अगदी तसंच आहे. सलमान नुकताच त्याच्या बहिणीचा म्हणजेच अर्पिता खान हिचा पती, आयुष शर्मा याच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी पोहोचला होता. 

पार्टीसाठी सलमान ज्या कारनं आला, त्याच कारनं एक खास व्यक्तीही आली. ही खास व्यक्ती म्हणजे सलमानची कथित प्रेयसी, Iulia Vantur.

सलमानमागोमागच ती कारमधून उतरली. माध्यमांकडे न पाहताच थेट कार्यक्रमाच्या ठिकाणी गेली. ती गेल्याचं पाहण्यासाठी म्हणून सलमानचीही नजर वळली, आणि बस्स मग काय चर्चा सुरु झाली बी- टाऊनच्या या स्टार आणि बहुचर्चित जोडीची. 

आयुष शर्माच्या बर्थडे पार्टीसाठी बॉलिवूडच्या अनेक कलाकारांची हजेरी होती. 

रितेश देशमुख, जिनिलिया डिसूझा, शबीर अहलूवालिया, कांची कौल यांनीही उपस्थिती लावली होती. 

आगामी प्रोजेक्टबाबत सांगावं तर, सलमान आणि आयुष 'अंतिम- द फायनल ट्रूथ' या चित्रपटातून एकत्र झळकणार आहेत. महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 26 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.