...म्हणून थेट न्यूयॉर्कमध्ये पोहोचली आलिया

जाणून घ्या यामागचं खरं कारण....

Updated: Oct 24, 2018, 02:51 PM IST
...म्हणून थेट न्यूयॉर्कमध्ये पोहोचली आलिया  title=

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर गेल्या काही दिवसांपासून परदेशात आहेत. वैद्यकिय उपचारासाठी म्हणून ते न्यूयॉर्कला गेल्याचं कळच आहे. यावेळी त्यांच्यासोबत मुलगा रणबीर आणि पत्नी नीतूही आहे. इतकच नव्हे, तर एका खास व्यक्तीनेही त्यांची भेट घेतली आहे. 

ऋषी कपूर यांच्या भेटीसाठी आलेली ती खास व्यक्ती म्हणजे अभिनेत्री आलिया भट्ट. 

सध्या आलिया भारतात परतली असली तरीही काही दिवसांपूर्वी ती न्यूयॉर्कमध्ये असल्याचं पाहायला मिळालं. 

आलिया आणि रणबीरचे न्यूयॉर्कमधील बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरलही झाले. त्यातीलच एक फोटो सध्या समोर येत आहे. ज्यामध्ये ती रणबीरच्या आई- वडिलांसोबत दिसत आहे. 

 
 
 
 

 

Family #aliaabhatt #aliabhatt #ranbirkapoor #rishikapoor #neetukapoor

A post shared by RanbirAlia (@ran_lia_love) on

 
 
 
 

 

#aliaabhatt #aliabhatt #ranbirkapoor #neetukapoor #ranlia

A post shared by RanbirAlia (@ran_lia_love) on

हा फोटो पाहता एक सुरेख 'फॅमिली फोटो'च असल्याची प्रतिक्रिया तुम्ही द्याल. 

रणबीर आणि आलिया यांच्या नात्याविषयी सांगावं तर, एका मासिकाला काही महिन्यांपूर्वी दिलेल्या मुलाखीत रणबीरने या नात्याची कबुली दिली होती. 

 
 
 
 

 

#ranlia in newyork #ranbirkapoor #aliabhatt #aliaabhatt

A post shared by RanbirAlia (@ran_lia_love) on

आलियानेही 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये रणबीरसोबतच्या नात्याविषयीच्या प्रश्नांना खुलेपणाने उत्तरं दिल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता कलाविश्वात वाहणारे लग्नसराईचे वारे कपूर कुटुंबापर्यंत कधी पोहोचणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.