बॉलिवूड अभिनेत्यानं लावली नेलपेंट, अर्ध्या केसांना दिला लाल रंग

त्यानं असं करत म्हटलं....   

Updated: Dec 1, 2020, 11:15 PM IST
बॉलिवूड अभिनेत्यानं लावली नेलपेंट, अर्ध्या केसांना दिला लाल रंग  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अमुक एका सेलिब्रिटीचा अंदाज हा कायमच त्याच्या लोकप्रियतेचे निकष निश्चित करत असतो. काही सेलिब्रिटी हे त्यांच्या अभिनयासाठी ओळखले जातात, काही चित्रपटांच्या निवडीसाठी तर काही हे त्यांच्या जगावेगळ्या दृष्टीकोनामुळं ओळखले जातात. 

अशाच सेलिब्रिटींपैकी एक नाव म्हणजे अभिनेता प्रतीक बब्बर prateik babbar याचं. Prateik Babbar मागील काही दिवसांपासून बऱ्याच कारणांमुळं चर्चेत आहेत. या अभिनेत्यानं नुकताच त्याचा वाढदिवसही साजरा केला. ज्यानंतर त्याचा एक आगळावेगळा आणि तितकाच लक्षवेधी लूक सर्वांसमोर आला. आपल्यालाला कोणत्याही सामाजिक घटक अथवा लिंगावरुन ओळखलं जाऊ नये यासाठी आग्रही असणारा प्रतीक या लूकमध्ये नेटकरी आणि सबंध कलाविश्वाचं लक्ष वेधत आहे. 

ज्यामध्ये त्यानं अर्धे केस आणि एक भुवई लाल रंगात रंगवून घेतली आहे. हाताची घडी घालत आणि कोणा एका गोष्टीवर एकटक नजर रोखत त्यानं हा फोटो पोस्ट केला आहे. ज्याचं कॅप्शन देत प्रतीक लिहितो, 'मी वेगळा आहे म्हणून ते माझ्यावर हसतात. पण, ते एकसारखेच आहेत म्हणून मी त्यांच्यावर हसतो- द जोकर'.

काही दिवसांपूर्वीच शेअर केलेला नेलपेंट लावतानाचा फोटो... 

प्रतीकनं यापूर्वीही एक फोटो पोस्ट केला होता. ज्यामध्ये तो चक्क नेलपेंट लावताना दिसला. त्याचं हे रुप पाहूनही नेटकरी हैराण झाले होते. मुख्य म्हणजे हा त्याच्या कोणत्या आगामी प्रोजेक्टसाठीचा लूक आहे का, असा प्रश्नही अनेकांनी उपस्थित केला. पण, प्रतीकनं मात्र याचाही उलगडा केलेला नाही. 

 

नेलपेंट लावलेला हा फोटो शेअर करत, ऑफिसमधला असाच एक दिवस.... अशा आशयाचं कॅप्शन लिहिलं होतं. आता त्याचं हे कॅप्शन आणि त्यासोबतचा फोटो याचा अर्थ नेमका लावायचा तरी कसा हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे.