जॉन अब्राहम असं का करतोय, आपल्या चाहत्यांचे मोबाईल हिसकावतोय?

जॉन त्याच्या वागण्यातून धक्का देतो तेव्हा....   

Updated: Nov 19, 2021, 04:16 PM IST
जॉन अब्राहम असं का करतोय, आपल्या चाहत्यांचे मोबाईल हिसकावतोय?  title=
व्हिडीओ स्क्रीनग्रॅब

मुंबई : बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम हा सध्या सत्यमेव जयते 2 या चित्रपटामुळं चर्चेत आला आहे. चित्रपटाच्या प्रसिद्धिच्या निमित्तानं तो सध्या बऱ्याच कार्यक्रमांना हजेरीही लावत आहे. पण यातच त्याचा एक व्हिडीओ मात्र सोशल मीडियावर चाहत्यांना धक्का देऊन जात आहे. 

जॉन सहसा चाहत्यांशी असणाऱ्या त्याच्या नात्यासाठी ओळखला जातो. पण, याच चाहत्यांना ज्यावेळी जॉन त्याच्या वागण्यातून धक्का देतो तेव्हा.... 

तेव्हा काय घडतं याचीच प्रचिती सध्या येत आहे. निमित्त ठरतोय तो म्हणजे एक व्हिडीओ. 

व्हायरल व्हिडीओमध्ये तो जे काही करतोय ते पाहणाऱ्यांना विश्वासच बसत नाहीये. 

व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे, की बाईकवर असणारे दोन चाहते व्हिडीओ शूट करत आहेत. 

तितक्यातच जॉन मागून येतो आणि तितक्यात त्याची नजर या तरुणांवर पडते. तो लगेचच तरुणांपैकी एकाच्या हातात असणारा मोबाईल हिसकावून घेतो. 

मोबाईल घेऊन जॉन पुढे जातो. त्याच्या मागूनच हे तरुणही बाईकनं मागेमागे येताना दिसतात. 

जॉननं थट्टामस्करी करत चाहत्यांतडून फोन हिसकावून घेतला. पण, लगेचच त्यानं तो त्यांना परतही केला. त्याचा हा अंदाज चाहत्यांची मनं पुन्हा एकदा जिंकून गेला.