ही कसली खादाडी; एका दमात अभिनेत्याकडून 64 रोट्या फस्त

एखादा पदार्थ आपल्यासमोर आल्यानंतर लगेचच त्याची चव चाखण्यासाठी आपण धाव मारतो. खाण्यावर नितांत प्रेम असणारे तरी किमान असंच करतात. नुकतंच एका बॉलिवूड अभिनेत्यानंही असंच काहीसं केलं आणि त्याची खादाडी पाहून एका हॉटेलमधील कर्मचारी कमालीचे थक्क झाले. 

Updated: Mar 28, 2022, 12:13 PM IST
ही कसली खादाडी; एका दमात अभिनेत्याकडून 64 रोट्या फस्त title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : एखादा पदार्थ आपल्यासमोर आल्यानंतर लगेचच त्याची चव चाखण्यासाठी आपण धाव मारतो. खाण्यावर नितांत प्रेम असणारे तरी किमान असंच करतात. नुकतंच एका बॉलिवूड अभिनेत्यानंही असंच काहीसं केलं आणि त्याची खादाडी पाहून एका हॉटेलमधील कर्मचारी कमालीचे थक्क झाले. 

अस्सल खवय्या असणाऱ्या या अभिनेत्यानं हॉटेलमध्ये गेलं असता तिथे चक्क 64 रोट्या/ चपात्या फस्त केल्या. तेव्हाच तिथं असणारा वेटर त्याला म्हणाला, सर इथे भातही आहे... 

'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) मध्ये जॉन त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेला होता. त्याचवेळी त्यानं हा खुलासा केला. 

हे खरं आहे का की तू एकदा 64 रोट्या संपवलेल्यास? त्यावर उत्तर देत जॉन म्हणाला,  हो. 

हे खरंय की मी असं केलं होतं आणि माझ्याकडे पाहून तिथे असणारा वेटर म्हणाला, सर अजून भातही यायचाय. 

जॉननं शेअर केलेल्या या आठवणीनं तिथे असणाऱ्या अनेकांच्याच चेहऱ्यावर हसू उमटलं. खाण्याप्रती जॉनचं हे प्रेम सर्वांची मनंही जिंकून गेलं. पण, त्याच्या भुकेचं प्रमाण पाहून भलेभले थक्कही झाले. 

We hope we make it to the National Awards, says John Abraham at Parmanu's  success party - Bollywood News & Gossip, Movie Reviews, Trailers & Videos  at Bollywoodlife.com

जॉन हा त्याच्या अभिनयासोबतत आणखी एका कारणामुळंही चर्चेत असतो. ही चर्चा आहे त्याच्या फिटनेसची. पिळदार शरीरयष्टी आणि देखण्या रुपाच्या बळावर जॉन कायम तरुणींच्या मनावर अधिराज्य करताना दिसला आहे.