मुंबई : Irrfan Khan First Love : काही कलाकार त्यांच्या अनोख्या अभिनय शैलीच्या बळावर प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेताना दिसतात, तर काही कलाकार हे अभिनयासोबतच त्याच्या व्यक्तीमत्त्वानंही रसिक मायबापाच्या मनात घर करतात. अभिनेता इरफान खान, हासुद्धा अशाच कलाकारांपैकी एक. (Bollywood Actor irrfan khan )
फार कमी वयातच इरफाननं जगाचा निरोप घेतला. पण, तो आजही प्रेक्षकांच्या मनात मात्र कायम आहे. इरफानचं आयुष्य हे कमाल रंजक होतं. त्यानं जितक्या मनसोक्तपणे अभिनय केला, तितक्याच दिलखुलासपणे तो प्रेमाच्या नात्यातही व्यक्त झाला.
साहबजादे इरफान अली खान असं त्याचं पूर्ण नाव. मुस्लिम पठाण कुटुंबात त्याचा जन्म झाला होता. त्याच्या वडिलांचा टायरचा व्यवसाय होता. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण मुस्लिम कुटुंबात असूनही इरफान शाकाहारी होता.
अनेकदा तर वडिलच त्याची खिल्ली उडवत असत की, हा पठाणांच्या कुटुंबामध्ये तर ब्राह्मण जन्माला आला आहे. तुम्हाला कल्पना नसेल, पण इरफान वयाच्या 16 व्या वर्षी दूझ विक्रेत्याच्या मुलीच्या प्रेमात पडला होता.
एका मुलाखतीत त्यानंच याबाबतचा खुलासा केला होता. किंबहुना इरफान दूध घेण्यासाठी याकरताच जात होता की तो तिथं असणाऱ्या त्या मुलीला पाहू शकेल. त्याचं हे पहिलं प्रेम कधीच पूर्ण झालं नाही.
कारण, जिच्यावर इरफाननं प्रेम केलं ती कोणा दुसऱ्याच्याच प्रेमात होती. जेव्हा त्यानं मोठ्या धाडसानं त्या मुलीशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिनं कोणा दुसऱ्याच्याच नावाची चिठ्ठी त्याच्या हाती दिली आणि तिथंच त्याचा पहिला प्रेमभंग झाला.