बिग बींच्या फ्रेंच दाढीचं श्रेय 'या' दिग्दर्शकाला, अखेर गुपित समोर

बिग बींच्या लूकला चार चाँद लावून गेली ती म्हणजे त्यांची फ्रेंच बिअर्ड

Updated: Aug 6, 2021, 10:09 PM IST
बिग बींच्या फ्रेंच दाढीचं श्रेय 'या' दिग्दर्शकाला, अखेर गुपित समोर  title=

मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या अभिनेत्याची प्रत्येत भूमिका अविस्मरणीय ठरली. ऑनस्क्रीन भूमिकांच्या निमित्तानं अमिताभ बच्चन विविध रुपांमध्ये दिसले, सोबतच त्यांच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यातही एक दमदार लूक त्यांनी प्रभावीपणे सर्वांसमोर आणला. 

बिग बींच्या लूकला चार चाँद लावून गेली ती म्हणजे त्यांची फ्रेंच बिअर्ड, अर्थात फ्रेंच स्टाईल दाढी. पण, तुम्हाला माहितीये का, त्यांच्या या स्टाईलमागे एका प्रसिद्ध दिग्दर्शकाचं श्रेय आहे. खुद्द अमिताभ बच्चन यांनीच याबाबतचा खुलासा केला होता. 

दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी 'अक्स' या चित्रपटाच्या वेळचा बिग बींचा एक किस्सा सर्वांसमक्ष आणला. इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलेल्या एका रीलमध्ये एका पुस्तकामध्ये बिग बींचा फोटो दिसत असून, त्यांनी लिहिलेला किस्साही दिसत आहे. 

असं म्हटलं जातं की, 'अक्स' या चित्रपटासाठी राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी बच्चन यांना अशा प्रकारची दाढी ठेवण्यास सांगितलं होतं. तेव्हापासून ही स्टाईल त्यांनी आपलीशी केली, ती आजपर्यंत कायम आहे. बच्चन यांची अंगकाठी, त्यांचं राहणीमान आणि एकंदर वेशभूषा या साऱ्याला त्यांची ही दाढी अगदी शोभून दिसते असं म्हणणं वावगं ठरणार नाही.