...म्हणून जया बच्चन आहेत बिग बींसाठी खास

त्यामागे कारणंही तशीच आहेत.  

Updated: Jun 3, 2019, 04:00 PM IST
...म्हणून जया बच्चन आहेत बिग बींसाठी खास  title=

मुंबई : हिंदी कलाविश्वात नेहमीच चर्चेत असणाऱ्या काही सेलिब्रिटी जोड्यांमध्ये अग्रस्थानी येणारं नाव म्हणजे बिग बी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन. रुपेरी पडद्यापासून खासगी आयुष्यापर्यंतचा त्यांचा प्रवास नेहमीच अनेकांसाठी आदर्श देणारा ठरला. जया बच्चन या बिग बींच्या आयुष्यात एक सकारात्मकता आणि आशेचा किरण घेऊन आल्या होत्या. अर्थाच त्यामागे कारणंही तशीच होती.

सुरुवातीच्या काळात अमिताभ बच्चन यांनी साईड हिरो म्हणून चित्रपटांमध्ये प्रवेश केला. त्यावेळी राजेश खन्ना यांच्याच नावाला प्रेक्षकांची पसंती होती. बऱ्याच प्रयत्नांनतरही बच्चन यांच्या वाट्याला धमाकेदार चित्रपट येत नव्हता. त्याचवेळी १९७३ मध्ये आलेल्या 'जंजीर' या चित्रपटाने अखेर त्यांच्या करिअरच्या गाडीला चालना दिली. 

पुढे जाऊन जया आणि अमिताभ बच्चन यांची जोडी रुपेरी पडद्यावर विशेष लोकप्रिय ठरली. आज याच जोडीने सहजीवनाची ४६ वर्षे पूर्ण केली आहेत. अभिषेक बच्चनने त्याच्या आई- वडिलांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छाही दिल्या आहेत.

बिग बीं आणि जया बच्चन यांचा प्रवास पाहिला तर, सुरुवातीच्या काळात एकिकडे अमिताभ यांचा संघर्ष सुरु असतानाच जया बहादुरी यांनी मात्र करिअरमध्ये चांगलाच टप्पा गाठला होता. दुसरीकडे बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करण्यासाठी कोणतीही अभिनेत्री तयार नव्हती. अशा वेळी अखेर जया यांनी त्यांच्यासोबत काम करण्यास होकार दिला. 

'बंशी बिरजू' या चित्रपटात त्या दोघांनीही पहिल्यांदाच स्क्रीन शेअर केली. ज्यानंतर एका अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीला कलाटणी मिळाली. पुढे जाऊन या दोघांनीही 'अभिमान', 'शोले' आणि 'सिलसिला' या चित्रपटांमध्येही स्क्रीन शेअर केली.

चित्रपट सुपरहिट होत गेले आणि पाहता पाहता खऱ्या अर्थाने जया भादुरी या अमिताभ बच्चन यांच्यासाठी खास ठरल्या. करिअरमधील चांगला काळ जया भादुरी यांच्यासोबत पाहिल्यानंतर पुढे बच्चन यांनी त्यांच्याशीच लग्नगाठ बांधली आणि जया बच्चन ही झाली त्यांची नवी ओळख.